Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निरीक्षक ठरले, आदेशही निघाले पण पोलिस ठाण्याचाच पत्ता नाही; उरुळी कांचन पोलीस ठाणे अद्यापही कागदावरच

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 3 January 2024, 20:14
Assistant police commissioners transfers in pune police

उरुळी कांचन : जिल्ह्यात गाजत असलेल्या उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पहिल्या पोलीस निरीक्षकपदी भोर पोलीस ठाण्यातील शंकर मनोहर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पण पोलीस ठाणे कधी सुरू होणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. शंकर पाटील यांची नियुक्ती पोलीस ठाणे सुरू झाल्यानंतर होईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, उरुळी कांचन पोलिस ठाणे नेमके केव्हा सुरु होईल, याची माहिती अद्याप दिली गेली नाही.

राज्य सरकारने हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्यास डिसेंबर २०२१ मध्ये मान्यता दिली असून, हे पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस दलामध्ये राहणार आहे. या संदर्भातील आदेश १३ डिसेंबर २०२१ रोजी गृह विभागाचे तत्कालीन सहसचिव कैलास गायकवाड यांनी काढला होता.

आमदार अशोक पवार यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लाख २७ हजार ३०० रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात एकूण १०० पदे भरली जाणार असून, यामध्ये एक पोलीस निरीक्षक, ४ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ५ उपनिरीक्षक, १५ सहाय्यक फौजदार, २० पोलीस हवालदार, पोलीस नाईक २५, तर पोलीस शिपाई ३० पदे भरली जाणार आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी तत्काळ शासनाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

 

उरूळी कांचन पोलीस चौकीला स्वतंत्र पोलिस ठाण्याचा दर्जा

सोशल मीडियात लोणी काळभोर पोलीस ठाणे पुन्हा ग्रामीण हद्दीत जाणार असा ‘जीआर’ गेल्या काही दिवसांपासून फिरत होता. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले उरूळी कांचन पोलीस चौकीला स्वतंत्र पोलिस ठाण्याचा दर्जा मंजूर झाला आहे. त्याच्या निर्मितीनंतर ते जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत राहणार आहे. उरूळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्याची अधिसूचना शासनाने काढली आहे. परंतु, उरुळी कांचन पोलीस ठाण्यासाठी जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने गेले दोन वर्षे ते सुरू होऊ शकले नाही.

अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांची भोर पोलीस ठाण्यातून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. अण्णा पवार यांची आर्थिक गुन्हे शाखेतून भोर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. तर दिलीप पवार यांची इंदापूर पोलीस ठाण्यातून राजगड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. सूर्यकांत कोकणे यांची नियंत्रण कक्षातून इंदापूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52
Next Post
Sahitya Mnadal request for one day holiday on sahitya samelan to jalgaon ZP CEO

अमळनेर तालुक्यातील सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी द्यावी; मराठी वाङ्‌मय मंडळाची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.