Uruli Kanchan News : उरुळी-कांचनकडून जेजुरीला जाणारा रस्ता रेल्वे पुलाच्या कामानिमित्त दोन दिवस बंद करण्यात येणार आहे. असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.(Uruli Kanchan News)
जेजुरीला जाणारा रस्ता रेल्वे पुलाच्या कामानिमित्त दोन दिवस बंद.
शिंदवणे घाट या ठिकाणी असणाऱ्या जेजुरी रेल्वे मार्गावरील पुलाचे काम सुरु आहे. या पुलाचे स्लॅब टाकण्यात येणार आहे. त्यामुळे हा रस्ता उद्या बुधवार (ता.१२) आणि गुरुवार (ता.१३) असे दोन दिवस बंद राहणार आहे. हा रस्ता शुक्रवार (ता.१४) रोजी सकाळी ७ वाजल्यापासून खुला करण्यात येणार आहे.(Uruli Kanchan News)
दरम्यान, या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.(Uruli Kanchan News)