Uruli Kanchan news : उरुळी कांचन, (पुणे) : नव्या पिढीला अमूल्य संस्कृतीची ओळख व्हावी आणि प्रिय आजी-आजोबांप्रती असणारे प्रेम वृद्धिंगत व्हावे यासाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उन्नती कन्या विद्यालयात आजी-आजोबा दिन शनिवारी (ता. ०९) विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
शाळेच्या प्रांगणात विद्यार्थिनींनी आजी-आजोबांचे पाद्यपूजन केले तर प्राचार्या नुपूर कांचन यांनी स्वागत केले. काही आजी-आजोबांनी मनोगतात अश्रूभरल्या नेत्रांनी प्रेमळ नातींनी खूप मोठं व्हावं, अशी ईश्वराजवळ प्रार्थना केली. आजी-आजोबांसाठी फॅशन शो, प्रश्न मंजुषा, संगीत खुर्ची सारख्या मनोरंजनाचा कार्यक्रमही झाला. यावेळी आजी-आजोबांनी उखाणे घेत डान्सचा आनंद घेतला.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी सुरेश कांचन, शाळेच्या अध्यक्षा नयन कांचन, प्राचार्या नुपूर कांचन, यांनी मोलाचे सहकार्य केले. तर हि स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी शाळेतील शिक्षक, विद्यार्थिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी, यांच्या सहकार्याने आजी आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.