Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : घरगुती गॅस सिलिंडरच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे प्रकार उरुळी कांचन परिसरात सर्रास सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे उकळणाऱ्या एका गॅस वाहकाचा प्रताप एका जागरूक ग्राहकामुळे उघडकीस आला आहे. Uruli Kanchan News
शासकीय नियमानुसार, घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना 916 रुपयांना घरपोच देणे एजन्सींना बंधनकारक आहे. मात्र, उरुळी कांचन येथील सुरानंद एचपी गॅस एजन्सीचे डिलिव्हरी बॉईज सिलेंडर घरपोच देताना पावतीवरील किमतीपेक्षा जास्त रक्कम सांगतात व तशी ती वसूल हि करींत आहेत. डिलिव्हरी बॉईज ग्राहकाकडून 916 रुपयांच्या ऐवजी 950 रुपये वसूल केले. ‘होम डिलिव्हरी चार्ज’च्या नावाखाली ही अतिरिक्त 34 रुपयांची मागणी करण्यात आली होती. Uruli Kanchan News
संबंधित ग्राहकाने या वाढीव दराबाबत संशय व्यक्त करत वाहकाला जाब विचारला. पावतीवर 916 रुपये असताना वरचे 34 रुपये कशाचे? असा सवाल केल्यावर संबंधित वाहकाची भंबेरी उडाली. अखेर, आपली चोरी पकडली गेल्याचे लक्षात येताच त्या वाहकाने ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या 950 रुपयांमधील अतिरिक्त 34 रुपये ग्राहकाला तातडीने माघारी पाठवले. Uruli Kanchan News
हा प्रकार केवळ एका ग्राहकापुरता मर्यादित नसून, दररोज शेकडो ग्राहकांकडून अशा प्रकारे 30 ते 40 रुपये अतिरिक्त उकळले जात असल्याची चर्चा परिसरात आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत अचूक माहिती नसल्याने अनेक नागरिक गॅस वितरकांनी मागितलेली रक्कम मुकाट्याने देतात. ही कमिशनखोरी आहे की एजन्सीच्या संगनमताने सुरू असलेली लूट? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, प्रत्येक सिलिंडरमागे होणारी ही छोटी वसुली हजारो ग्राहकांचा विचार करता लाखो रुपयांच्या घरात जाते. “पावती 916 रुपयांची असताना वरचे पैसे कोणाच्या खिशात जात आहेत?” असा प्रश्न विचारत, प्रशासनाने अशा लुटीला चाप लावावा आणि संबंधित एजन्सीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी उरुळी कांचन येथील नागरिक करत आहेत. Uruli Kanchan News
याबाबत सुरानंद एचपी गॅस एजन्सीचे संचालक संभाजी कांचन म्हणाले, “आम्ही कोणत्याही वाहकाला ठरल्यापेक्षा जास्त पैसे घेण्यास सांगत नाहीत. तरीही त्या वाहकाची चौकशी केली जाईल, यापुढे जास्तीचे पैसे घेतल्यास वाहकावर कारवाई केली जाणार आहे.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही” Uruli Kanchan News







