पुणे : ”गिव्ह इट अप” या उपक्रमांतर्गत खोटी माहिती देणाऱ्या रेशनधारकांकडून गव्हाची ४२ तर तांदळाची ३२ रुपये दराने वसुली करणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना माने म्हणाल्या कि, अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्यांनी निकषात जे नागरिक बसत नाहीत, त्यांना प्रशासनाच्या वतीने स्वतः बाहेर पडण्यासाठी ‘गिव्ह इट अप’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात पुणे विभागातील भरपूर नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. तर जिल्ह्यातील आतापर्यंत ५२२३ जणांनी रेशनवरील धान्याचा हक्क सोडला आहे. धान्य हक्कसोड करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतरही खोट्या माहितीच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्यांकडून वरील प्रमाणे वसुली केली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजना व प्राधान्य योजनेत २६ लाख ७१ हजार १५६ लाभार्थी आहेत. तर दोन्ही योजना मिळून ५ लाख ८४ हजार ९०२ रेशनकार्ड धारक आहेत. या योजनेत सलवतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्याकरिता पात्र असलेल्या लाभार्थ्यांना लाभ घेऊ शकतात. अन्यथा पात्र नसल्यास या योजनेचा लाभ नाकारू शकतात.
दरम्यान,”गिव्ह इट अप” या योजनेत सहभाग घेण्यासाठी जवळच्या रेशन धान्य कार्यालयात किंवा जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. तसेच रेशन दुकानांमध्येही अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा योजनेचा हक्क सोडण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रशासनाने मुदत दिली आहे.
अपात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे :
१) ज्या कार्डधारकांच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय/निमशासकीय सेवेत किंवा निवृत्ती वेतन धारक
२) कुटुंबामध्ये दोन, तीन, चारचाकी, किंवा ट्रॅक्टर
३) कुटंबाचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये
४) ५ एकरपेक्षा जास्त शेती (बागायती किंवा जिरायती)
५) पक्के घर