नवी दिल्ली : सध्या OnePlus आपला नवीन स्मार्टफोन भारतात आणि जागतिक बाजारात लवकरच लाँच करणार आहे. कंपनी OnePlus 13 सीरीज पुढील महिन्यात लाँच करणार आहे. ज्यामध्ये OnePlus 13 आणि OnePlus 13R असणार आहे. कंपनीने आधीच OnePlus 13 चायनीज मार्केटमध्ये लाँच केला आहे. त्यानंतर आता भारतीय मार्केटमध्ये हा फोन मिळणार आहे.
OnePlus 13R चे नवीन पेज Amazon वर लाईव्ह दिसत आहे. ज्यावर त्याच्याशी संबंधित काही माहिती उपलब्ध आहे. हा हँडसेट स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये AI Powered फीचर्सही उपलब्ध आहेत. चीनमध्ये लाँच केलेल्या OnePlus 13 मध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट उपलब्ध आहे. कंपनीने मागील सीरीजमध्येही असेच केले होते. ब्रँडने फ्लॅगशिप फोनमध्ये नवीन प्रोसेसर दिला होता, तर OnePlus 12R ने एक वर्ष जुना फ्लॅगशिप प्रोसेसर म्हणजेच Snapdragon 8 Gen 2 दिला होता.
OnePlus कंपनी 7 जानेवारी 2025 रोजी OnePlus 13 सोबत OnePlus 13R लाँच करणार आहे. हा इव्हेंट भारतात रात्री नऊ वाजता होणार आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच होणाऱ्या OnePlus Ace 5 ची रीब्रँडेड व्हर्जन असेल. कंपनी 26 डिसेंबर रोजी चीनमध्ये OnePlus Ace 5 लाँच करणार असल्याची माहिती देण्यात आली.