पुणे: पर्वती औद्योगिक वसाहतीतील स्काय आयलाइफ इमारतीत वॉटरप्रूफिंगचे काम करत असताना १८ वर्षीय योगेश रामबिहारी केवट याचा पाय घसरून इमारतीवरून पडल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. १८ एप्रिल रोजी हि भीषण घटना घडली होती. प्राथमिक माहितीनुसार, स्कॉय आयलाईफ या इमारतीच्या बाल्कनीत योगेश केवट हा वॉटर प्रुफिंगचे काम करत होता. दरम्यान, ठेकेदारांनी सेफ्टी हुक लावून दिले नाही. काम करतांना सेफ्टी जाळीही लावल्यात आली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार बी बी ठाकूर यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार दिलीप चनाबसाप्पा शहाणे (५५), भोजु लक्ष्मण मेघावत (३८) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केवट हा सुरक्षा उपकरणांशिवाय काम करत होता. दरम्यान, त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला. वरच्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. स्थानिकांनी पाहिल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.