Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tukdebandi Law Amendment: तुकडेबंदी कायद्यात ‘ऐतिहासिक’ बदल, कोट्यवधींच्या मालमत्तांना मिळणार सातबारा, ‘1 गुंठा’ जमीन आता…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 22 November 2025, 16:11
Tukdebandi Law Amendment: 'Historic' changes in Tukdebandi Act, properties worth crores will get seven-fold, '1 guntha' land will now...

Tukdebandi Law Amendment: राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यात मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल करून शहरी भागातील छोट्या जमिनींच्या खरेदी-विक्रीवरील प्रमुख अडथळा दूर केला आहे. नव्या अध्यादेशानुसार जिल्ह्यांतील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीतील अकृषिक जमिनींवर तुकडेबंदी कायद्याची अट लागू राहणार नाही. त्यामुळे शहरांच्या हद्दीत 1 किंवा 2 गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले भूखंडही आता कायदेशीररीत्या खरेदी-विक्री करता येतील. सरकारचा अध्यादेश 3 नोव्हेंबरपासून लागू झाला असून गृहनिर्माण विभागाची मानक कार्यपद्धती 4 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली. (Breaking News)

यापूर्वी तुकडेबंदी कायद्यामुळे अशा छोट्या जमिनींची अधिकृत नोंदणी सातबाऱ्यावर होत नव्हती. त्यामुळे नागरिकांनी जमीन विकत घेतली तरी ती त्यांच्या अधिकृत मालकीत येत नसे. नव्या निर्णयामुळे छोट्या भूखंडांनाही कायदेशीर मालकी हक्क, नोंदणी आणि सातबाऱ्यावर नाव नोंदवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. कमी गुंतवणुकीत जमीन घेऊ इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.

सरकारने तुकडेबंदी कायद्याच्या कलम 8 मधील अडथळे दूर केले असून कलम 2 मध्ये नवीन पोटकलम (4) समाविष्ट करून 1965 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या अनियमित व्यवहारांना नियमित मान्यता देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे पूर्वी खरेदी केलेल्या छोट्या भूखंडांनाही कायदेशीर वैधता मिळू शकते. प्रादेशिक योजना विस्तार, नागरीकरण आणि जमिनींचे अकृषिक वापरांमध्ये रूपांतर वाढत असून, तुकडेबंदी कायद्यामुळे बांधकाम, वीज-पाणी जोडणी, उद्योग परवानग्या अशा अनेक प्रक्रियांमध्ये अडथळे निर्माण होत होते. सरकारने याच समस्यांचा विचार करून सुधारणा केल्याचे सांगितले जात आहे.

आता नोंदणीकृत दस्तऐवज असल्यास फेरफार प्रक्रिया पूर्ण करून सातबाऱ्यावर खरेदीदाराचे नाव नोंदविता येईल. भविष्यातील खरेदी-विक्रीवर कोणतीही अडचण राहणार नाही. हा बदल महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दी आणि प्रादेशिक योजनांतील अकृषिक झोनमध्ये लागू होणार आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post
Solapur Hyderabad Highway Accident

Solapur Hyderabad Highway Accident : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या जीपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp