Solapur Hyderabad Highway Accident : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जीवघेण्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपुर्वी पुण्यातील नवले पुलावर झालेला भयंकर अपघात. त्यानंतर आता महाराष्ट्राला हादरवणारी, धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर घडली. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रुझर गाडीचा टायर फुटल्याने एक भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे, तर ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातातील सर्व प्रवासी दक्षिण उळे (सोलापूर) येथील रहिवासी असून, ते नळदुर्ग येथील देवस्थानाकडे जात असतानाच, काळाने वाटेत त्यांच्यावर झडप घातली. Solapur Hyderabad Highway Accident टायर फुटल्यामुळे अनियंत्रित झालेली गाडी पलटी होऊन ट्रॅक्टरला धडकल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तात्काळ सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
परंड्यात ही घडली दुर्दैवी घटना
सोलापूर येथील या दुर्घटनेसोबतच, धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथेही एक दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं. परंडा शहरातील सोनारी रोडवर उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली सापडून बार्शी येथील सविता शंकर मुसळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्या त्यांच्या भाडेकरूसह स्कुटीवरून भैरवनाथांचे दर्शन घेऊन बार्शीकडे परतत होत्या. Solapur Hyderabad Highway Accident सोनारी रोडवरील एचडीएफसी बँकेसमोरून जात असताना, त्यांनी उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात किंवा समोरून वाहन आल्यामुळे स्कुटीवरील नियंत्रण सुटले आणि मागे बसलेल्या सविता मुसळे खाली पडल्या. त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या मागील टायरखाली आल्याने त्यांचा जागीच अंत झाला.
या अपघातामुळे परंडा शहरातील खराब रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या असून प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या दोन मोठ्या अपघातांव्यतिरिक्त सोलापूर-पुणे महामार्गावरील सापटने गावाजवळ २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी दोन भरधाव कारची समोरासमोर धडक झाली. भरधाव वेगामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या अपघातात एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर इतर पाच जण किरकोळ जखमी झाले. Solapur Hyderabad Highway Accident सर्व जखमींवर तातडीने टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. राज्यात अल्पावधीत घडलेल्या या अपघातांच्या मालिकेमुळे, नागरिकांनी वाहतूक नियमांचे कठोर पालन करणे आणि वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगणे किती आवश्यक आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.







