सुरेश घाडगे
परंडा : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ( ७५ वे वर्ष ) हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत नागरिकांनी घरोघरी तिरंगा ध्वज फडकवावा, असे आवाहन परंड्याचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी केले आहे .
परंडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय येथे स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत शुक्रवार ( दि. ५ ) परंडा तहसिलदार रेणुकादास देवणीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना वरील आवाहन देवणीकर यांनी केले आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुनील जाधव, नगर परिषद मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली ,डॉ. शहाजी चंदनशिवे, मंडल अधिकारी पवार ,प्रकल्प अधिकारी के. बी.शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्यने उपस्थित होते.
पुुढे बोलताना तहसिलदार देवणीकर म्हणाले कि,भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक, घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. तसेच स्वातंत्र्याची ज्योत कायम तेवत रहावी व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जन माणसात राहावी .या उद्देशाने या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानापूर्वक संस्मरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आपल्या भारतीय नागरिकास झेंडा फडकवायचा अधिकार दिला आहे, तो झेंडा दिलेल्या वेळेत फडकावीने व उतरविणे त्याचा सन्मान करणे अतिशय महत्त्वाचे आहे. दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये ध्वज आपल्या घरावर लावणे बंधनकारक असेल व १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर तो सन्मानाने काढून व्यवस्थित जपून ठेवावे. कारण तिरंगा हा आपल्या देशाची अस्मिता आहे. आणि दिलेली नियमावलीचे पालन तंतोतंत करावे आपल्या आजूबाजूला तिरंगा विषयी माहिती द्यावी. झेंडा कसा फडकवावा व कसा उतरवावा याविषयी सविस्तर माहिती द्यावी. असे तहसिलदार देवणीकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना उपस्थितांना सांगितले.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली म्हणाल्या की, भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत .तेव्हा भारत सरकारने भारतातील प्रत्येक नागरिकास तिरंगा ध्वज फडकविण्याचा अधिकार दिला आहे . त्यामुळे तिरंग्याचा सन्मान करत ध्वज फडकविणे व उतरविणे ही आपली जबाबदारी आहे.
दरम्यान, शिंदे महाविद्यालय, तहसील कार्यालय व नगरपरिषद कार्यालय यांच्या संयुक्त्त विद्यमाने शहरात हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थिनी प्रज्ञा बनसोडे हिने देशभक्तीपर गीत सादर केले.
यावेळी डॉ. विशाल जाधव, प्रा.दत्तात्रय मांगले, डॉ. कृष्णा परभने, डॉ.सचिन चव्हाण, महेश कसबे, महेश एकसिंगे ,जलाल मुजावर, अमोल अंगरके, बापू जाधव, दत्ता आतकर, वसंत राऊत, अरुण माने ,डॉ.सचिन चव्हाण, विद्यार्थी आदि उपस्थित होते .