सिडनी: ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीच्या संशोधकांनी प्रथमच विषारी एपिडर्मल नेक्रोलिसिस (टीईएन) या घातक त्वचारोगाने ग्रस्त रुग्णांना बरे केले आहे. या विषारी टीईएनसाठी प्रथम उपचार विकसित करण्यात आले आहे. मेलबर्नमधील वाल्टर अॅण्ड एलिझा हॉल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च आणि जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्रीच्या संशोधकांसह आंतरराष्ट्रीय सहकार्याने नेचरमध्ये हे यशस्वी संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
टीईएन ज्याला लियेल सिंड्रोम देखील म्हणतात. हा एक दुर्मिळ त्वचारोग आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात फोड आणि त्वचेत भेगा पडतात. यामुळे डिहायड्रेशन, सेप्सिस, न्यूमोनिया आणि अवयव निकामी होऊ शकतात. ही परिस्थिती सामान्य औषधांच्या वापराच्या साईड इफेक्टमुळे उद्भवते. या कर्करोगामुळे ३० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो.
नवीन अभ्यासात आढळून आले आहे की, जेएसके- एसटीएटी सिग्नलिंग पाथवे (पेशीतील प्रथिनांमधील परस्पर संवादाची साखळी जी रोग प्रतिकारशक्ती, सेल मृत्यू आणि ट्यूमर निर्मिती यांसारख्या प्रक्रियेत गुंतलेली असते) यांच्या अतिक्रियाशीलतेमुळे टीईएन होतो. संशोधनांचे लेखक होली अँडर्टन यांनी सांगितले की, अशा घातक रोगांवर उपचार शोधणे हे वैद्यकीय संशोधनाचे प्रमुख कार्य आहे. यामुळे अनेक रुग्णांचा जीव वाचू शकतो.