पुणे : पंचांगानुसार, आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष
आज तुम्ही योग्य समय सुचकता ठेवलीत, तर कामं व्यवस्थित पार पडतील.
वृषभ
आज चौकस बुद्धी आणि वक्तृत्वाच्या जोरावर तुमची कामे मार्गी लावाल.
मिथुन
महिला काही नावीन्यपूर्ण काम करतील, संततीसाठी काही कारणाने पैसा खर्च करावा लागेल
कर्क
आज कफविकार असणाऱ्यांनी पथ्य पाणी सांभाळावे, अतिविचारामुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येण्याचा संभव आहे.
सिंह
आज जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर मार्ग काढाल आणि स्वतःचा मान राखून घ्याल.
कन्या
आज आर्थिक दृष्टीने फायदेशीर नसला, तरी स्वतःचा उत्कर्ष करून घेण्यासाठी संघर्ष करायची तयारी ठेवाल.
तूळ
आज व्यापार उद्योगात मनाच्या चांगल्या संधी मिळतील, त्याचा फायदा पुढच्या दृष्टीने होणार आहे
वृश्चिक
आज शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहे, लेखकांच्या हातून उत्तम लिखाण होऊ शकते
धनु
आज महिलांना ऐन अडचणीच्या वेळी योग्य ती मदत मिळेल, नवीन गोष्टींची सुरुवात कराल
मकर
आज तडफदारपणे सर्व कामे पार पाडाल, अचानक प्रवासाचे योग येऊ शकतात
कुंभ
आज ध्येयाच्या आड येणारा निर्णय कोणताही टाळलेलाच बरा पडेल, पराक्रमाला संधी मिळेल
मीन
आज कामे पूर्णत्वाच्या मार्गाला लागतील, सभोवताली घडणाऱ्या अनेक गोष्टी मानसिक बळ देणाऱ्या ठरतील.