Tirupati Balaji News मुंबई : एकदातरी तिरूपतीचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. पण आता महाराष्ट्रातील भाविकांची हीच इच्छा लवकरच पूर्ण होण्यास मदत होणार आहे. (Tirupati Balaji News) कारण आता हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस सुरु केली जाणार आहे. (Tirupati Balaji News) त्यामुळे नागपूरकरांचे तिरुपतीचे दर्शन सोपे होणार आहे. (Tirupati Balaji News)
वंदे भारत एक्स्प्रेसच्या पाच गाड्या एकाचवेळी सुरु होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. मुंबई-मडगाव, बंगळुरु-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ-इंदोर, भोपाळ-जबलपूर या पाच मार्गांवर 26 जून रोजी वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. तसेच, नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.
प्रवास होणार जलदगतीने
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूरवासियांना सिकंदराबादपर्यंतचा प्रवास जलद गतीने करता येणार आहे. याशिवाय सिकंदराबाद ते तिरुपती दरम्यानही वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. यामुळे नागपूरकरांना नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसने सिकंदराबादपर्यंतचा आणि त्यापुढे सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसने थेट तिरुपतीपर्यंतचा प्रवास करणे सोयीचे होणार आहे.
160 किमी प्रतितास धावते ट्रेन
‘वंदे भारत’ ही हायस्पीड रेल्वे तब्बल 180 किमी प्रतितास या वेगाने धावण्यास सक्षम आहे. मात्र, या गाडीला 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे. यामुळे या गाडीने जलद आणि आरामदायी प्रवास प्रवाशांना करता येत आहे.