उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या तळवाडी येथील भरचौकात तिघांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
सदरची मारहाण कोणत्या कारणावरून झाली याची अद्याप माहिती मिळू शकली नसून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी वाहतूक कोंडी झाली असून बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात