लोणी काळभोर, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मार्गावर कॉंक्रिटीकरण करण्यासाठी लोणीकंद ते थेऊरगाव रस्ता रविवार (ता. ०७) ते मंगळवार (ता. ३०) ऑगस्टपर्यंत जड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
या कालवधीत दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक सुरु राहील असेही सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी कळविले आहे.
लोणीकंद, लोणीकाळभोर वाहतूक विभाग पुणे अंतर्गत वरील कालावधीत थेऊर फाटा, नगर रस्ता ते थेऊर फाटा, सोलापूर रस्ता दरम्यान जड वाहनांस बंदी करण्यास येत आहे. त्यामुळे खराडी बायपास ते हडपसर तसेच वाघोली-केसनंद-वाडेबोल्हाई, पारगाव-केडगाव-चौफुला, पुणे- सोलापुर महामार्ग या रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.