दिनेश सोनवणे
दौंड: आद्यक्रांतिकारकराजे उमाजी नाईक यांचे विचार देशातील तरुणांनी आत्मसात करावे. असे प्रतिपादन, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडीचे दौंड तालुका अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी केले आहे.
आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती उत्सव दिना निमित्त (दापोडी ता. दौंड) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन लक्ष्मण जाधव यांनी केले आहे.यावेळी सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त व्यख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते.
सुहास रुपनवर, आबासाहेब गुळमे, रामभाऊ टूले, नंदू गायकवाड, नारायण गूळमे, या मान्यवरांनी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित केले.
यावेळी बोलताना व्याख्याते सचिन झगडे ( सत्यशोधक् प्रचारक ) यांनी राजे उमाजींचा यांचा सत्य इतिहास मांडून वर्तमानातील बहुजन सामाज्याच्या अन्यायला वाचा फोडत, व्यवस्था परिवर्तनाचा मुलमंत्र दिला.
या कार्यक्रमास आनंद दादा थोरात मित्र मंडळ दापोडी यांनी यांचे सहकार्य लाभले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाथनगर विद्यालय बोरिपार्धी येथील शिक्षक लक्ष्मण शिंदे यांनी केले.