हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात सुरु असलेल्या नवीन मुळा-मुठा कालव्याचे अस्तरीकरणाचे काम तात्काळ बंद करावे असे निवेदन भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन शहरच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, खडकवसला धरण ते इंदापूर तालुक्यात वाहत असलेला नवीन मुळा-मुठा कालवा आहे. या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम झाल्यास परिसरात असलेल्या नर्सरी व्यावसायिक, शेतकरी व शेतीपूरक व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.
पाटबंधारे खात्याकडून कुंजीरवाडी ते यवतपर्यंत सिमेंट अस्तरीकरणाचे काम सुरु केल्यामुळे पाणी जमिनीत मुरणार व शेतकरी अडचणीत येईल. याच भागातील ८० टक्के शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह या पाण्यावरती आहेत. त्यामुळे आपण हे काम ताबडतोब थांबवावे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या उरुळी कांचन, तरडे, कुंजीरवाडी, सोरतापवाडी या गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी असे निवेनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा संघटक धर्मेंद्र खांडरे, हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, रेल्वे क्षेत्रीय समिती सदस्य अजिंक्य कांचन, उरुळी कांचन भाजपा शहराध्यक्ष अमित कांचन, युवा मोर्चा उपाध्यक्ष खुशाल कुंजीर, माथाडी अध्यक्ष करण धुमाळ, आबासाहेब चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.