Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाला लोणी काळभोर पोलिसांकडून “वाटाण्याच्या अक्षदा,” सर्वच प्रकारचे अवैध  धंदे नव्या जोमाने सुरु…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 6 November 2022, 18:26

विशाल कदम 

लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर व हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा गावठी दारु विक्री, मटका, जुगार, गुटखा विक्री, गांजा विक्री यासारख्या सर्वच प्रकारचे अवैध  धंदे नव्या जोमाने सुरु होऊ लागले आहेत. भेकराईनगर, फुरसुंगी, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह हडपसर व लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत सर्वच प्रकारचे अवैध धंदे खुलेआम सुरू होऊनही, पोलीस प्रशासनाचे हाताची घडी अन् तोंडावर बोट असे धोरण अवंलबले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आठवडाभऱापुर्वी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आपआपल्या हद्दीतील दारु, मटका, गुटखा विक्री, गांजा विक्री यासारख्या सर्वच अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश पोलिस अधिकाऱ्यांच्या गुन्हे विषय़क मिटिंगमध्ये (Crime Meeting) दिले होते. तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याचे आढळून येतील, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला होता.

 

मात्र अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानंतरही हडपसर व लोणी काळभोर हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध सुरु होऊ लागल्याने, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाला लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व त्यांच्या हाताखालील पोलिसांनी वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचे दिसुन येत आहे.

पुणे शहर पोलिसांचा विशेष सामाजिक शाखा शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकुन, जुगार, मटका, गांजा विक्री सारख्या अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना, वरील दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत मात्र मागिल काही दिवसापासुन अवैध धंद्यांचा मोठा सुळसुळाट सुरु झाला आहे.

पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठेल्यांवर, हॉटेलमध्ये बेकायदा अवैध दारू राजरोसपणे सुरु आहेत. दारुबंदीच्या निर्णयानंतरही शहरात काही ठिकाणी राजरोसपणे दारु विक्री तसेच  खुलेआम  मटका आणि जुगार स्थानिक ठाणेदारांच्या आशिर्वादाने सुरुच असल्याचे चित्र आहे. पोलिस ठाण्यातीलच काही कर्मचाऱ्यांचे या अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याची धडक चर्चा सुरु झाली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आठवडाभऱापुर्वी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आपआपल्या हद्दीतील दारु, मटका, गुटखा विक्री, गांजा विक्री यासारख्या सर्वच अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले असले तरी, अवैध धंदे रोखण्याची स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मानसिकता दिसून येत नाही. ते कानाडोळा करीत असल्याने येथील मटका, जुगार, दारू खुलेआम विक्री सुरु झाल्याने येथे गुन्हेगारांची संख्या देखील वाढली आहे. हे अवैद्य धंदे शहरातील रस्त्यालगत खुलेआम दुकाने थाटून सुरु आहेत. ही दुकाने स्थानिक व वरिष्ठ पोलीस अधिकारी ये-जा करतांना पाहत असतात. मात्र कारवाई का करत नाही? हा प्रश्न  कायमच सतावत आहे.

गुटखा बंदी नावालाच…
राज्यात गुटखा बंदी असतानाही, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ९९ टक्के पानटपऱ्यात मात्र हवा तेवढा गुटखा खुल्या पध्दतीने विकला जात आहे. उरुळी कांचन, लोणी काळभोर, माळीमळा, लोणी स्टेशन हद्दीतील काही पानटपऱ्यात तर गुटख्याची विक्री होलसेल पध्दतीने केली जात आहे. याबाबतची माहिती पोलिसांना असुनही, लोणी काळभोर पोलिस मात्र त्याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. दारु, मटका, गुटखा विक्री, गांजा विक्री यासारख्या सर्वच अवैध धंदे सुरु होत असताना, पोलिसांना मात्र ते दिसत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30
Next Post

शिक्षक बँक वाचवण्यासाठी 'सभासद परिवर्तन पॅनल' ची गरुड भरारी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.