Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आंबळे परिसरातील बिबट्याची दहशत अखेर संपली; वन विभागाच्या पिंजऱ्यात चार वर्षीय नर बिबट्या जेरबंद…..

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 6 August 2026, 22:44

न्हावरे : आंबळे(ता.शिरूर) परिसरातील आंब्याचा मळा येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाळीव जनावरांवर हल्ले करून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा चार वर्षांचा नर बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.गुरुवारी (दि.६)पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई यशस्वी ठरली.त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकत समाधान व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून आंबळे परिसरात बिबट्याने शेळ्या,गाई, वासरे,कालवडी तसेच पाळीव कुत्र्यांवर वारंवार हल्ले केले होते. याशिवाय शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांनाही वेळोवेळी बिबट्याचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत वन विभागाने चासकमान डाव्या कालव्यालगत आंब्याचा मळा परिसरात बिबट्याच्या नियमित वावराच्या ठिकाणी अचूक नियोजन करून पिंजरा उभारला होता.सुरुवातीला बिबट्या वन विभागाला वारंवार हुलकावणी देत होता.मात्र अखेर गुरुवारी पहाटे तो पिंजऱ्यात अडकला आणि वन विभागाच्या प्रयत्नांना यश आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भानुदास शिंदे,वनरक्षक गणेश झिरपे,संदीप गव्हाणे,मनोज चौधरी आणि दिनेश गोऱ्हाड यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.पकडलेल्या बिबट्याला पुढील तपासणी व पुनर्वसनासाठी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले.

 

बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली भीती अखेर दूर झाली असून,वन विभागाच्या तत्पर कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.मात्र,परिसरात वन्यजीवांचा वावर लक्षात घेता भविष्यातही नियमित गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरूच ठेवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06

खराडीत विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका; चार जणांविरुद्ध गुन्हा तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 19:39

3 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार? उद्यापासून कर्मचाऱ्यांचा संप; ATM- UPI बाबत महत्त्वाची अपडेट

Sunday, 27 September 2026, 18:32

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपणार! भाजपचे उमेदवार 48 तासांत जाहीर होणार?

Sunday, 27 September 2026, 17:48
Next Post

मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी प्रकरणाची चौकशी; जिल्हा शल्य चिकित्सकांकडून समिती स्थापन करण्याचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp