Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी प्रकरणाची चौकशी; जिल्हा शल्य चिकित्सकांकडून समिती स्थापन करण्याचे आदेश

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 6 August 2026, 22:58

शिरूर : मंचर उपजिल्हा रुग्णालयात शासनाची सोनोग्राफी सुविधा उपलब्ध असतानाही गरोदर महिला व इतर महिला रुग्णांना खासगी केंद्रांकडे पाठविले जात असल्याच्या गंभीर प्रकाराची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे.सामाजिक कार्यकर्ते तथा व्हिसलब्लोअर निलेश यशवंत वाळुंज यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक नितीन देवमाने यांच्याकडे सविस्तर निवेदन देत निष्पक्ष व पारदर्शक चौकशीची मागणी केली होती.या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री व आरोग्य उपसंचालक,पुणे यांनाही पाठविण्यात आली आहे.

निवेदनानुसार,शासनाच्या रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध असतानाही अनेक महिला रुग्णांना “बाहेरून सोनोग्राफी करून घ्या” असा सल्ला दिला जात असल्याची माहिती समोर आली.याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.जाधव यांच्याशी संपर्क साधला असता,मशीनच्या तांत्रिक मर्यादांमुळे गर्भधारणेच्या काही विशिष्ट टप्प्यातील सोनोग्राफी रुग्णालयात होत नसल्याचे तसेच अतिरिक्त कार्यभारामुळे ते दररोज उपलब्ध राहू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र,शासनाने सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांना खासगी दवाखान्यांची वाट दाखविणे ही गंभीर बाब असल्याचे वाळुंज यांनी निवेदनात नमूद केले आहे. शासनाच्या आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा आर्थिक फटका थेट गरजू नागरिकांना बसत असून,खासगी केंद्रात एका सोनोग्राफीसाठी सुमारे दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असल्याने हा अतिरिक्त भार अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात रुग्णालयात प्रत्यक्ष कोणत्या प्रकारच्या सोनोग्राफी उपलब्ध आहेत.काही सेवा का दिल्या जात नाहीत,रुग्णांना खासगी केंद्रांकडे पाठविण्यामागे केवळ तांत्रिक अडचणी आहेत की प्रशासकीय हलगर्जीपणा अथवा अन्य हितसंबंध,याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मशीन,तज्ज्ञ डॉक्टर व मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे सेवा बाधित होत असल्यास त्या तातडीने सुरळीत करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

 

दरम्यान,जिल्हा शल्य चिकित्सक नितीन देवमाने यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत “सोमवारी चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येईल,” असे स्पष्ट केले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना निलेश वाळुंज म्हणाले, “जिल्हा शल्य चिकित्सकांनी तातडीने दखल घेतली,ही समाधानाची बाब आहे. शासनाच्या आरोग्य सुविधा सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक, प्रभावी व विनाविलंब मिळाल्या पाहिजेत.या प्रकरणातील जबाबदारांवर निष्पक्ष कारवाई होणे,हाच या पाठपुराव्यामागील व्यापक जनहिताचा उद्देश आहे.”

‘सुविधा शासनाची… खर्च मात्र जनतेच्या खिशातून!’

रुग्णालयात सुविधा असूनही नागरिकांना खासगी केंद्रांकडे धाडले जात असेल,तर हा केवळ तांत्रिक बिघाड नसून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे गंभीर अपयश मानावे लागेल.शासनाच्या योजनांचा लाभ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत पोहोचतो का,याची जबाबदारी संबंधित यंत्रणेलाच स्वीकारावी लागणार आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06

खराडीत विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका; चार जणांविरुद्ध गुन्हा तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 19:39

3 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार? उद्यापासून कर्मचाऱ्यांचा संप; ATM- UPI बाबत महत्त्वाची अपडेट

Sunday, 27 September 2026, 18:32

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपणार! भाजपचे उमेदवार 48 तासांत जाहीर होणार?

Sunday, 27 September 2026, 17:48
Next Post

भाग्य उजळणार!आजपासून 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धीचे दिवस, जाणून घ्या राशीभविष्य ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp