पुणे : आज शुक्रवारचा दिवस असून वैदिक ज्योतिषात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस धनदाती देवी लक्ष्मी आणि कोशाध्यक्ष कुबेरदेव यांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. आज ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे एक दुर्मीळ योग जुळून येत आहे, ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींच्या जातकांवर पडणार आहे. जाणून घ्या सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा राहील:

मेष: तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या अथक परिश्रमांचे गोड फळ आज तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या मेहनतीचे चीज होण्याचा हा काळ आहे.

वृषभ: आज तुमच्या कलागुणांना आणि बुद्धिमत्तेला योग्य वाव मिळेल. कोणताही निर्णय घेताना मनाची द्विधा मनःस्थिती होऊ देऊ नका, विचारांवर ठाम राहा.

मिथुन: कामातील हलगर्जीपणा तुम्हाला महागात पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहा. मात्र, आर्थिक बाबतीत परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल.
कर्क: पैशाच्या कमाईचे नवनवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. वेळेवर संधी ओळखून त्याचा लाभ घेणे तुमच्याच हातात आहे.
सिंह: फक्त एकाच बाबीवर लक्ष केंद्रित केल्यास नुकसान होऊ शकते. निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करणे हिताचे ठरेल.
कन्या: आज विसरभोळेपणा वाढण्याची शक्यता आहे. तसेच, आरोग्य जपण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहिलेले बरे.
तूळ: मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. तुमच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला उत्तम दिशा देणाऱ्या संधी आज चालून येतील.
वृश्चिक: स्वभावतील हट्टीपणा आणि लहरीपणा बाजूला ठेवा. कार्यक्षेत्रात कठीण परिस्थिती असली तरी तुम्ही चांगली प्रगती कराल.
धनु: कोणाचीही जामीनकी घेणे आज टाळा. अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे मन थोडे विचलित होऊ शकते.
मकर: पाठीच्या किंवा मणक्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता योग्य उपचार घ्या. थकित किंवा अडकलेली जुनी वसुली होण्याची शक्यता आहे.
कुंभ: महिलांनी मूडी स्वभाव टाळावा. इतरांना मदत करताना स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड होणार नाही याची काळजी घ्या.
मीन: भूतकाळात हातची निसटलेली एखादी मोठी संधी पुन्हा एकदा तुम्हाला मिळण्याची प्रबळ शक्यता आहे.







