Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ह्यांची पोरगी सासरी नीट नांदत नाही’ रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; ‘मी खून केला’ म्हणाला अन्….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 August 2026, 20:03

पुणे: पुण्यातील महंमदवाडी परिसरात मुलगी व्यवस्थित राहत नसल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिच्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने खुनाची माहिती पोलिसांना दिली. काळेपडळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सैफन बाबुलाल सय्यद (वय ४३, रा. राजीव गांधी कॉलनी, तरवडे वस्ती, हडपसर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हनुमंत ऊर्फ सागर सुग्रीव कांबळे (वय २५, रा. आशिर्वाद पार्क, महंमदवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास महंमदवाडी येथील लक्ष्मी पार्कजवळील वन परिसरात सिमेंटच्या टाकीजवळ हा प्रकार घडला. सना ही सैफन सय्यद यांची मुलगी असून तिचे आंतरधर्मीय विवाह झाले आहेत. ती आरोपीच्या बहिणीच्या मुलासोबत राहत होती.

सना ही सासरी व्यवस्थित राहत नसल्याच्या कारणावरून सैफन सय्यद आणि हनुमंत कांबळे यांच्यात वाद झाला. या वादातून संतापलेल्या हनुमंतने सैफन यांच्या डोक्यात दगडाने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सैफन यांचा मृत्यू झाला.

 

घटनेनंतर रात्री साडेअकराच्या सुमारास हनुमंत कांबळे काळेपडळ पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्या गळ्याजवळ जखम झाली होती आणि कपड्यांवर रक्ताचे डाग होते. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सैफन सय्यद यांची हत्या केल्याचे सांगितले. मुलगी सना आमच्याकडे व्यवस्थित राहत नसल्याने वाद झाल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलीस हवालदार विजया जयदीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेपडळ पोलिसांनी हनुमंत कांबळे याला अटक केली असून, हत्येमागील नेमका घटनाक्रम आणि वादाची इतर कारणे याबाबत पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06

खराडीत विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका; चार जणांविरुद्ध गुन्हा तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 19:39
Next Post

पुणेकरांनो सावधान! उद्या शहरात तिरंगा रॅलीमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp