पुणे : एरंडोली, (ता. श्रीगोंदा) येथील रुग्णावर के ई एम हॉस्पिटल पुणे येथे उपचार झाल्यानंतर डिस्चार्ज करण्यासाठी आवश्यक असलेले १ लाख ७४ हजार रुपये बिल आमदार अशोक पवार यांनी दिलेल्या पत्रामुळे कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कुटुंबियांनी आमदार अशोक पवार यांचे आभार मानले आहेत.
एरंडोली, (ता. श्रीगोंदा) येथील आयुष ईथापे (वय-४) याच्यावर के ई एम हॉस्पिटल पुणे उपचार सुरु होते. आयुषच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबियांनी स्वतःचे आणि लोकवर्गणीतून गोळा केलेले असे एकूण १ लाख ३६ हजार रुपये हॉस्पिटल मध्ये जमा केले. परंतु उपचाराचा खर्च मोठा असल्याने मुलाचे पालक चिंतेत होते.
खाजगी रुग्णालयांचा खर्च परवडणारा नाही. हाताला काम नसताना रुग्णालयाचा खर्च आवाक्याबाहेरचा आहे. अशा परिस्थितीत आयुषच्या नातेवाईकांनी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याकडे मदत मिळावी म्हणून मागणी केली. यावर आमदार अशोक पवार यांनी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास के ई एम हॉस्पिटल पुणे येथील व्यवस्थापकांना फोन करून व लेखी पत्र दिल्याने रुग्णाचे राहिलेले १ लाख ७४ हजार रुपयांचे बिल माफ केले. त्यामुळे आयुषला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देखील मिळाला आहे.
दरम्यान, आमदार अशोक पवार यांनी रात्री उशिरा के ई एम हॉस्पिटल पुणे येथे फोन करून व लेखी पत्र दिल्याने रुग्णाच्या कुटुंबियांनी आमदार अशोक पवार यांचे आभार मानले आहेत. तसेच आयुषचे नातेवाईकांनी म्हटले आहे कि, आपण आपले समाजसेवेचे कार्य करताना संबंधित गरजू व्यक्ती कोणत्या भागातील आहे, कोणत्या जाती – धर्माची आहे याला कधीच महत्व दिले नाही, त्यामुळे आज आपण अनेक गरीब कुटुंबाचे आधारवड बनला आहात. आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि समाजसेवेचे आपण हाती घेतलेले हे कार्य अखंडपणे चालू रहाण्यासाठी आपल्याला उत्तम आरोग्याचे दीर्घायुष्य लाभावे यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना.