पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.नानांचे असे अचानक जाणे अनेकांसाठी धक्कादायक ठरले, ज्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल समाजमाध्यमांत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.मात्र, आता बांबोळी येथील ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालया’च्या वैद्यकीय पथकाने तयार केलेला शवविच्छेदन अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

या अहवालानुसार, नाना पाटेकर यांच्या हृदयाच्या मुख्य धमनीत रक्ताची गुठळी तयार झाली होती. रक्तवाहिनीत हा अडथळा निर्माण झाल्याने त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, हा पूर्णपणे नैसर्गिक मृत्यू आहे.8 ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे 5.30 वाजता दोनापावला येथील मणिपाल रुग्णालयात नाना पाटेकर यांना मृतावस्थेत आणण्यात आले होते.

एखाद्या व्यक्तीला मृतावस्थेत रुग्णालयात आणल्यास पोलिसांना कळवणे अनिवार्य असते. त्यानुसार या प्रकरणाची नोंद ‘मेडिको-लीगल केस’म्हणून करण्यात आली होती.पणजी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 194 अन्वये सुरुवातीला अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून सखोल तपास सुरू केला होता.नानांचे पुतणे प्रसाद पाटेकर आणि पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथे पाठवण्यात आला.

नाना पाटेकर यांच्यावर आधीपासूनच हृदयविकाराचे उपचार सुरू होते. शवविच्छेदनाचा अधिकृत अहवाल हाती आल्यानंतर पोलिसांच्या तपासाला पूर्णविराम मिळाला असून, त्यांच्या निधनाचे मूळ कारण हृदयविकाराचा झटका हेच असल्याचे निश्चित झाले आहे. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या खास अभिनयशैलीचा ठसा उमटवणाऱ्या या महान कलाकाराच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.







