Leopard News : शिरुर / युनूस तांबोळी : शिरुर तालुक्यातील शरदवाडीमध्ये बिबट्या गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालत होता. या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले. दरम्यान, बिबट्याचे दिवसाला दर्शन व पाळीव प्राण्यांवर हल्ले यामुळे अजून वाढीव पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी अशोक गांजे व ग्रामस्थांनी केली आहे.(Leopard News)
बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले.
या भागात बिबट्यांचा वाढत्या धुमाकूळ यामुळे येथे पिंजरा लावण्यात आला होता. रात्रीच्या वेळी दहा महिने वयाचा नर जातीचा बिबट या पिंजऱ्यात अडकला आहे. याबाबतची माहिती कळल्यानंतर वनरक्षक लहू केसकर व वनसेवक महेंद्र दाते यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर या बिबट्याला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केद्रात पाठवून देण्यात आले आहे. नागरिकांनी वनविभागाच्या सूचनेनुसार शेतावर जाताना गटाने जावे, मोबाईलवर गाणी वाजवावीत, फटाके वाजवावीत, शेतकऱ्यांच्या सूचनेप्रमाणे पिंजरा लावण्यात येईल.(Leopard News)
बिबट मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. शाळेतील मुलांचा प्रवास धोकादायक झाला आहे. त्यामुळे पिंजरे लावणे आवश्यक झाले असल्याचे गांजे यांनी सांगितले.(Leopard News)