Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्ली आंदोलनाची धग पुण्यापर्यत! पोलिसांची मोठी कारवाई; 102 आंदोलकांना घेतलं ताब्यात…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 October 2026, 21:09

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आता संपूर्ण देशात विरोधाचा सूर उमटू लागला आहे. राजधानी दिल्लीतील या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरे असणाऱ्या मुंबई आणि पुण्यातही तीव्रतेने उमटू लागले आहेत.

मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक पहारा ठेवला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मैदानाभोवती 1 किलोमीटरपर्यंत मजबूत नाकाबंदी आणि बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आंदोलन सुरू होण्याआधीच शहराच्या विविध भागांतून अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरीकडे, पुण्यात लाल महाल चौकात घोषणाबाजी करणाऱ्या 102 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी लष्कर पोलीस ठाण्यात हलवण्यात आले आहे.

या आंदोलनाची सुरुवात दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या आवाहनाने झाली. पोलिसांनी रीतसर परवानगी नाकारली असतानाही, देशभरातून नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने राजधानीत दाखल झाले. प्रमुख विरोधी पक्षांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवत निदर्शनांत सहभाग घेतला. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आणि छावणीचे स्वरूप आलेल्या दिल्लीत वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

वाहतुकीवर मर्यादा घालण्यासाठी ट्रेन आणि मेट्रो सेवा खंडित करण्यात आल्या, तरीही आंदोलक वेगवेगळ्या मार्गांनी जंतर-मंतरकडे कूच करत आहेत. याच गदारोळात सीआरपीएफ जवानांनी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतले. पंजाबच्या चंदीगडमध्ये माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरही प्रशासनाने हीच कारवाई केली. या घडामोडींमुळे देशभरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43

अक्कलकोटमध्ये FDA ची मोठी कारवाई; स्वामी समर्थ मंदिर परिसरातून ८५० किलो मिठाई जप्त, अनेक दुकाने बंद!

Tuesday, 17 November 2026, 18:39

भोरमध्ये जमिनीच्या हक्कसोडपत्राच्या वादातून पोलीस पाटलांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून! आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Tuesday, 17 November 2026, 18:12

मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी? ३२ गावांच्या करप्रश्नी माऊली आबा कटके आक्रमक

Tuesday, 17 November 2026, 17:58
Next Post

पुण्यातील MPSC आंदोलनावरून राजकीय वाद पेटला! रोहित पवारांवर पडळकर घसरले; ‘हा तर तमाशाचा फड....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp