सागर जगदाळे
भिगवण, (पुणे) : इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात सर्वसामान्य लोकांमध्ये सहजच मिसळतात त्यांच्याशी हितगुज करतात अडी – अडचणी विचारून घेतात. यामुळेच का ते लोकांना आपलेसे वाटतात.
याचाच प्रत्यय भिगवण येथील मच्छी विक्रेते शंकर धोत्रे यांना आला.
भिगवण येथील कुसाळकर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी माजी मंत्री भरणे येथे आले असता रोड लगत दारात मासे साफ करण्यासाठी बसलेले धोत्रे यांना बघताच दत्तात्रय भरणे तेथे थांबुन धोत्रे यांची उपजीविका असलेला मत्स्य व्यवसायाविषयी त्यांना अनेक प्रश्न विचारले. यावर साफ केलेले मासे हॉटेल व्यावसायिकांना देत असल्याची माहिती धोत्रे यांनी दिली.
मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या धोत्रे कुटुंबीयांची संपूर्ण माहिती यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी यावेळी घेतली. अचानक झालेली भेट व सर्वसामान्य कुटुंबातील शंकर धोत्रे यांची केलेली विचारपुस यामुळे धोत्रे यांनी मामांच्या या स्वभाव गुणाचे कौतुक करताना म्हणाले की आमदार असूनही सामान्य नागरिकाची केलेल्या चौकशीवरून आमदार कसा दमदार असावा याचा अभिमान असल्याची भावना धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, इंदापूर तालुक्यात माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे भ्रमण करत असताना ग्राऊंड झिरो वरून वावरून सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ अधिक घट्ट होताना दिसत आहे.