दिनेश सोनवणे
दौंड : दौंड नगरपालिकेतील आरोग्य कर्मचारी यांना तात्काळ आरोग्य विमा उतरावा . अशी मागणी दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रकाश सोनवणे यांनी केली आहे.
प्रकाश सोनवणे यांनी या मागणीचे निवेदन दौंड नगरपालिकेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रिया गुरव यांना दिले आहे. यावेळी ॲड. अजयकुमार डेंगळे,महेश जगदाळे, पोपटराव गायकवाड, संकेत क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दौंड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा, व अपघात विमा उपलब्ध करून दयावा. जेणेकरून भविष्यात कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. नगरपालीकेतील आरोग्य कर्मचारी, साफ सफाईचे काम करत असल्याने, त्यांना व त्यांच्याकुटुंबातील व्यक्तींना आरोग्याची समस्या नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन योग्य त्या उपाय योजना कराव्यात. असे या निवेदनात म्हटले आहे.