पुणे : शहरात मुलांकडून माता- पित्याला घराबाहेर काढण्याची प्रकरण वाढत असून आता जिल्हाधिकारी अशा मुलांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलासा मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक निर्वाह कायदा अर्थात आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मदत केली जाते. त्यामुळे वृद्ध माता- पित्यांना घरावर काढणाऱ्या मुलांना आता जिल्हा प्रशासनाचा चांगलाच दणका बसणार आहे.
ज्येष्ठ नागरिक निर्वाह कायदा हा ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचे संरक्षण आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. काही वेळेस पत्नीच्या सांगण्यावरून मुलं आपल्या आई-वडिलांना त्यांच्याच घरातून बाहेर काढतात. तसेच मुलं म्हणून त्यांना कोणतीही मदत करत नाही त्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिक अर्ज करू शकतात आणि अर्ज केल्यावर त्यांना अशा प्रकरणात मदत केली जाऊ शकते. त्याचबरोबर मुलांकडून पोटगी मिळवून दिली जाऊ शकते किंवा आई-वडिलांच्या नावाने घर असेल तर त्या मुलांना घराच्या बाहेर काढून आई-वडिलांना घर मिळवून दिलं जातं अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितली. जानेवारीपासून आतापर्यंत या कायद्याचा योग्य वापर करून 42 ज्येष्ठांच्या बाजूने निर्णय देऊन आतापर्यंत त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देण्यात आल आहे.
सध्या शहरात आई-वडिलांना घरावर काढण्याचे प्रमाण खूप वाढलं असून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासन पुढे सरसावले आहे. ज्यां आई वडिलांच्या नावावर स्वतःचं घर असून देखील त्यांना मुलांनी बाहेर काढल असेल तर त्यांनी आमच्याकडे एक अर्ज करावा.त्यांना या कायद्याच्या अंतर्गत मदत केली जाणार असल्यास उपजिल्हाधिकारी कदम यांनी स्पष्ट केल आहे. त्यामुळे आता मुलांना आई-वडिलांना घराबाहेर काढताना ही विचार करावा लागणार आहे. आई-वडिलांना बाहेर काढले तर जिल्हा प्रशासन त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे.