अजित जगताप
सातारा : सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघड होत असूनही त्याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे आंदोलने करावी लागत आहेत. काल सामाजिक कार्यकर्ते श्री सुशांत मोरे यांनी आमरण उपोषण सुरू करताच विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी लेखी पत्र पाठवून कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे उपोषणाची सांगता झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभार बाबत जिल्हाधिकारी यांनी संचालक आरोग्य विभाग मुंबई यांना चौकशीचे आदेश देणे कामी कारवाई करावी असे पत्र दिले आहे. अनधिकृत व बेकायदेशीर दारू दुकाने व विक्री प्रकरणी माननीय जिल्हाधिकारी यांनी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी सातारा यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
पृथ्वी डेव्हलपर्स आंबेकर यांनी रस्त्यावर बांधलेली अनधिकृत भिंती बाबत सहायक संचालक नगररचना सातारा नगरपरिषद यांना जागेवर जाऊन पाहणी करून चौकशीचे आदेश मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिले आहेत. सानप हद्दीतील पेठ गुरुवार पेठ रविवार येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी जागेवर जाऊन पाहणी करून नोटिसा व शास्तीची आकारणी करावी असे आदेश अतिक्रमण विभागाला मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिले आहेत.
आर टी ओ कार्यालयातील झुणका भाकर केंद्र सील करण्याचे आदेश सातारा तहसीलदार यांनी पोलीस बंदोबस्तात करण्याचे आदेश पुरवठा विभागाला दिले आहेत.
तसेच फुटपाथवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई नगर पालिके मार्फत सुरू आहे.कराड येथीलआयोध्या नगरी मलकापूर नगरपालिकेतील रस्ता खुला करणे बाबत मुख्याधिकार्यांनी जागेवर जाऊन पाहणी करून अतिक्रमण काढून रस्ता खुला करावा असे आदेश जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांनी मुख्याधिकारी मलकापूर नगर परीक्षेत कराड यांना दिले आहेत.
भाडळे ता. कोरेगाव येथील रस्ता खुला करणेकामी ग्रामसेवक यांनी कारवाई करावी असे आदेश गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरेगाव यांनी दिले आहेत.
ग्रामपंचायत वेळे ता. सातारा येथील अनधिकृत बांधकाम नोटीस देऊन कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकारी सातारा यांनी दिले आहे
वरील सर्व उपोषण बाबत कारवाईची पत्रे आणि समक्ष अधिकारी यांनी येऊन आश्वासन दिलेमुळे आज सोमवारी दि १७ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३५ मिनिट वेळी जिल्हा प्रशासन अधिकारी श्री अभिजित बापट, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी उपनगराध्क्ष शंकर माळवदे , पोलिस अधिकारी यांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लिंबू सरबत घेऊन श्री मोरे यांनी उपोषण मागे घेतले आहे.
या उपोषणाला अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विलंबाने का होईना?कारवाई करण्याचे धाडस दाखविले आहे.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माननीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पण, त्याच्याच जिल्ह्यात भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही शासकीय पातळीवर कारवाई होत नसल्याने नको पालकमंत्री,,, नको विरोधी पक्षनेते,, नको त्या खात्याचे अधिकारी,, अशी लोकशाही मार्गाने सर्वसामान्य माणसाला मागणी करावी लागत आहे. त्यामुळे याबाबींचा स्वतः मुख्यमंत्र्यांनी जरूर विचार करावा अशी ही गाऱ्हाणी यानिमित्त सुरू झाली आहे.