2025 calendar and 1941 calendar : 2025 हे वर्ष अपघातांचं वर्ष असल्याचं म्हंटल जात आहे. अनेक मोठ्या जोतिषांनी देखील हे वर्ष धोक्याचं असल्याचं सांगितलं आहे. आणि 2025 च्या सुरुवातीपासून असच काहीसं दिसून देखील येत आहे. याचदरम्यान आता एक धक्कादायक बाब समोर येत आहे. सध्या इंटरनेटवर 1941 चं कॅलेंडर व्हायरल होत आहे. पण या कॅलेंडर मध्ये असं काय आहे? आणि देशात घडत असलेल्या घटनांच्या मधेच हे कॅलेंडर का व्हायरल होत आहे. जाणून घेऊया…
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं 1941 च कॅलेंडर हे 2025 सारखंच आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे १९४१ हे वर्ष देखील शापित वर्ष म्हणून ओळखलं जात. आणि आता 2025 मध्ये अशाच घटना घडत आहेत. ज्यामुळे हे वर्ष देखील शापित असल्याचं बोललं जात आहे. हा फक्त योगायोग नसून, पुन्हा उलटे दिवस येत असल्याचं तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

1941 वर्षात काय-काय घडलं?
1941 हे वर्ष दुसऱ्या महायुद्धाचे निर्णायक आणि भयानक वर्ष होते. या वर्षी जर्मनीने सोव्हिएत युनियनवर हल्ला केला होता. जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिकाने या युद्धात उडी घेतली. युद्धाचा भडका युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये देखील पसरला होता. म्हणजेच जगातील दोन मोठ्या महासत्ता, सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या युद्धात थेट सहभागी होत्या. दुसऱ्या महायुद्धाचा आशिया आणि युरोपवर मोठा परिणाम झाला. यानंतर अनेक देशांचे नकाशे बदलले. तसेच युद्धाचा सर्वात मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला.
2025ची खराब सुरुवात….
2025 ची सुरुवात अनेक वाईट घटनांनी झाली. यावर्षी जग अनेक संकटांना तोंड देत आहे. विशेषतः युद्धासारख्या परिस्थिती निर्माण होत आहेत. रशिया-युक्रेन या दोन्ही देशांमधील युद्ध तीन वर्षांपासून सुरू आहे. या वर्षी त्याचे संकट अधिकच वाढलेले दिसते. भारत-पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष पहायला मिळाला. तर इराण-इस्राईल या दोन देशांमध्ये सुरु असलेले युद्ध टोकाला आले आहे. दोन्ही देश एकमेकांना संपवण्याच्या धमक्या देत आहेत.
दरम्यान, 2025 आणि 1941 या दोन्ही वर्षांत जागतिक अस्थिरता आणि युद्धसदृश परिस्थिती आहे. पण यावेळी घटना मात्र, वेगवगेळ्या आहेत. अशातच नागरिकांमध्ये आत भीतीचे वातावरण निर्माण आहे.







