Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याच्या जुन्नरपर्यंत पोहोचले दहशतवादाचे धागेदोरे! NIAच्या धाडीने खळबळ; संशयिताचे सिमकार्ड डिजिटल उपकरणांची जप्ती

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 25 August 2026, 17:44

पुणे : गुजरातमधील सायबर दहशतवाद प्रकरणाच्या तपासाला वेग देत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) देशातील पाच राज्यांमध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी झडती घेतली. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर, गुजरातमधील नडियाद, तेलंगणातील रामगुंडम, बिहारमधील गोपालगंज आणि दिल्ली येथे ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरातील माई मोहल्ला परिसरात एका संशयिताची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. चौकशीत नेमके काय निष्पन्न झाले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, संबंधित संशयिताचे सिमकार्ड जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कारवाईला NIAकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

NIAच्या प्रसिद्धी निवेदनानुसार, ही कारवाई RC-01/2025/NIA/AMD या गुजरात सायबर दहशतवाद प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणाची नोंद 25 जून 2025 रोजी करण्यात आली होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारत सरकारच्या विविध संस्थांच्या 54 संकेतस्थळांवर अत्याधुनिक DDoS हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यांमध्ये महत्त्वाच्या संगणकीय संसाधनांसह Critical Information Infrastructureला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे.

राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि एकात्मतेला बाधा पोहोचवणे तसेच नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला या प्रकरणाची नोंद गुजरात ATSने केली होती.

 

तपासादरम्यान करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणातून आरोपींना DDoS हल्ल्यांसाठी तयारी आणि कौशल्य वाढविण्यास मदत करणाऱ्या काही संशयितांची माहिती तपास यंत्रणेला मिळाली. त्यानंतर सक्षम न्यायालयाकडून झडती वॉरंट घेऊन संबंधित संशयितांच्या ठिकाणी कारवाई करण्यात आली.

झडतीदरम्यान हॅकिंगशी संबंधित आक्षेपार्ह माहिती असलेली डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली. यामध्ये तीन लॅपटॉप, पाच मोबाईल फोन, पेन ड्राइव्हसह इतर डिजिटल उपकरणांचा समावेश आहे. अटक आरोपींशी संशयितांचे संबंध आहेत का, याबाबतही चौकशी करण्यात आली.

मात्र, ही उपकरणे नेमक्या कोणत्या ठिकाणांहून जप्त करण्यात आली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास NIAकडून सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

संबंध एकीसोबत तर संसार दुसरीसोबत! ३ वर्ष लग्नाचं आमिष दाखवत शरीरसंबंध ठेवले नंतर दुसऱ्याच तरुणीसोबत…युवा नेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Monday, 5 October 2026, 19:28

मगरपट्टा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सातही आरोपी निर्दोष मुक्त; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

Monday, 5 October 2026, 19:21

अन् नराधमांनी तिला वासनेचा शिकार बनवलं! लॉजवर नेत कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं; धमकी देत दोघांनी आळीपाळीने शरीराचे लचके…

Monday, 5 October 2026, 19:14

सहकार महर्षी हरपले! ‘शरद’ कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत घोडके यांच्या निधनाने पैठणमध्ये शोककळा

Monday, 5 October 2026, 19:07

शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Monday, 5 October 2026, 18:04

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या MPSC आंदोलनाला मोठे यश! MPSC च्या माजी आणि विद्यमान अध्यक्षांवर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मोठी शिफारस

Monday, 5 October 2026, 16:56
Next Post

पुण्यातल्या 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर प्रशासनात खळबळ! 'पोषण आहाराची ४८ तासांत तपासणी करा' अदिती तटकरेंचे कडक निर्देश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp