रायगड : गेल्या काही दिवसापासून राज्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.अशातच आता रायगड जिल्ह्यामधील माणगावध्ये भीषण अपघात झाला आहे.या अपघातात टेम्पोची सायकल,पोलीस गाडी आणि दुचाकीला जोरदार धडक झाली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमधील मोर्बा-माणगाव मार्गावर हा अपघात झाला आहे.भरधाव टेम्पो ट्रॅव्हल्सची सायकल, पोलीस जीप आणि दुचाकीला धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. दिनेश शेलार, विजया शेलार आणि वामन पवार सर्व राहणार माणगाव अशी मृतांची नावं आहेत.







