लोणी काळभोर : कपडे धुण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थिनीला घरी बोलावून शिक्षकाने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हांडेवाडी (ता. हवेली) परिसरात घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी १७ वर्षीय पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सुदर्शन शेरमाळे (मूळ रा. मनमाड जि. नाशिक) याच्यावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही बिझनेस संबंधी क्लास करण्यास हांडेवाडी येथे जुलै २०२३ मध्ये आली होती. तर आरोपी हा त्या क्लासमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता. तेव्हा पीडित विद्यार्थिनी आणि आरोपीची ओळख झाली होती.
आरोपीने घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन पीडितेला नोव्हेंबर महिन्यात एके दिवशी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले. पीडिता घरी गेल्यानंतर कपडे धुवत होती. तेव्हा आरोपीने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडिता घाबरल्याने तिने याची वाच्यता कोठेही केली नाही. त्यामुळे याचा फायदा घेऊन आरोपीने पुन्हा पीडितेवर दोनदा बलात्कार केला.
दरम्यान, पीडित तरुणीने याबाबत चाईल्ड हेल्पलाईन क १८१ पर संपर्क साधला. सखी यन स्टॉप सेंटर ०१ मुंढवा येथे जाऊन घडला प्रकार सांगितला. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनासोबत घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या.
सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपी सुदर्शन शेरमाळे याच्यावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करत आहेत.