हनुमंत चिकणे
बार्शी : गुळपोळी गावाने ‘एक गांव एक गणपती उत्सवाच्या’ माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे. गावातील गणेशोत्सव गावाच्या एकोप्याचे प्रतिक समजले जाते. रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ आहेच त्यानुसार स्वामी समर्थ गणेश उत्सव मित्र मंडळाचा उपक्रम हा प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण जाधव यांनी केले.
गुळपोळी (ता. बार्शी ) येथील स्वामी समर्थ गणेश उत्सव मित्र मंडळाने रविवारी (ता. ०४) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन गावातील बुजुर्ग व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले आले. यावेळी झालेल्या बैठकीत जाधव बोलत होते. स्वामी समर्थ मित्र मंडळ हे मागील १४ वर्षांपासून गणेशोत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहे. आज घेतलेल्या रक्तदान शिबिरात ९३ जणांनी रक्तदान केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य, कृष्णा चिकणे, माजी सदस्य, शिरीष चिकणे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे, पोस्टमन लक्ष्मण काळे, दिपक चिकणे, बापू राऊत, कल्याण तू चिकणे, अण्णासाहेब चिकणे, विठ्ठल मचाले, गणेश म्हेत्रे, धनाजी मचाले, उद्योजक श्रीकृष्ण मचाले, धनाजी सर चिकणे, बापू म्हेत्रे, नागेश बारवकर, अनिल मचाले, राजू शेख, भागवत चिकणे, प्रविण चिकणे, योगेश चिकणे, अमर चिकणे, बालाजी बारवकर, गणेश बारवकर, काका लंगोटे, राहुल मचाले, अशोक दुसंगे, पोलीस हवालदार रियाज शेख, समीर पठाण, यांच्यासह गावातील महिला, व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबिरास इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बार्शी संचलित श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शीचे सुधीर सुमंत, किरण जाधव, अर्जुन दळवी, अनुराधा डोंगरे, सुप्रिया लगदिवे, यांनी सहकार्य केले.
यापुढे बोलताना जाधव म्हणाले, “बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मंडळाला कोणतीही सामाजिक उपक्रम राबवा अशी विनंती केली नव्हती तरीही सामाजिक भान जपत मंडळाने केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. संपूर्ण गाव एकत्रित असल्याने पोलिसांनाही आनंद वाटला.”