Friday, April 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News- टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष व उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मुंबई – अहमदाबाद मार्गावर पालघर जिल्हात अपघातात जागीच मृत्यु..

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 September 2022, 16:41

पुणे- टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष व उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मुंबई – अहमदाबाद मार्गावर साडे तीन वाजणेच्या सुमारास पालघर जिल्हात अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघर जिल्हा अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

 

उद्योगपती सायरस मिस्त्री अहमदाबादहुन मुंबईकडे परतत असताना, झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आता टाटा रुग्णालयातून गुजरातमधील त्यांच्या घरी नेले जाणार आहे.

रतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर टाटा समुहाचा कार्यभार सायरस मिस्त्री २९ डिसेंबर २०१२ रोजी हाती घेतला होता . मात्र त्यानंतर कांही वर्षातच रतन टाटा व सायरस मिस्त्री यांच्यात वाद सुरु झाल्याने, त्यांना टाटा उद्योग समुहावरुन पाय उतार व्हावे लागले होते.

दरम्यान देशातच नव्हे तर जगभरात बांधकाम उद्योगात गेल्या अनेक वर्षांपासून बस्तान बसलेल्या आणि तब्बल 8.8 अब्ज डॉलरची मालमत्ता असलेल्या पालनजी शापूरजी मिस्त्री यांचा धाकटा मुलगा म्हणजे सायरस मिस्त्री. गेल्या अनेक वर्षांपासून मिस्त्री आणि टाटा कुटुंबात कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. मिस्त्री हे 2006पासून टाटा सन्सचे संचालक म्हणून कार्यरत असल्याने त्यांना कंपनीच्या कारभाराची व्यवस्थित माहिती आहे. 43 वर्षांचे मिस्त्री हे शापूरजी पालनजी समूहातील पालनजी मिस्त्री यांचे पुत्र असून त्यांच्याकडे टाटा सन्सचे तब्बल 18.5 टक्के समभाग आहेत.

4 जुलै 1968ला जन्मलेले सायरस यांचं शिक्षण झालं लंडनच्या इंपिरिअल कॉलेजमध्ये. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण लंडन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये घेतलं. तिथे त्यांनी मास्टर ऑफ सायन्स मॅनेजमेंटमध्ये पदवी संपादन केली. ते इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्सचे फेलोदेखील होते. लंडनमध्ये उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायात महत्त्वाच्या व्यवस्थापकीय जबाबदा-या पाहिल्या. टाटा ग्रुपशिवाय ते शापूरजी पालनजी अँड को., फोर्ब्स गोकॅक, अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि युनायटेड मोटर्स इंडिया यांसारख्या कंपन्यांचे डायरेक्टर पददेखील सांभाळत होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सहकार मंत्र्यांचा मोठा निर्णय! भीमा-पाटसच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती

Friday, 24 April 2026, 20:39

Pune Solapur Road : केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, २ राज्यमंत्री, ३ खासदार आणि ५ आमदारांचे राजकीय वजन असतानाही पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीकडे कानाडोळा!”

Friday, 24 April 2026, 18:40
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जागेअभावी पोलीसच ‘वाऱ्यावर’ ; आरोपींसाठी जेल नाही, कर्मचाऱ्यांना बसायला जागा नाही ; त्रस्त पोलिसांनी धरला बदलीचा रस्ता..

Friday, 24 April 2026, 18:13

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीच्या माजी सरपंचाकडून महिलेला अश्लील शिवीगाळ करून कुटुंबाला दिली मारण्याची धमकी

Friday, 24 April 2026, 17:59

उरुळी कांचनमध्ये ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या टेम्पोची वृद्धाला पाठीमागून धडक ; उपचारादरम्यान मृत्यू ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 17:20
Pune Crime: Brother-in-law attacked with "cement gattu" after saying he would not send his sister! Brother-in-law and brother-in-law clash over going to visit their in-laws; Both seriously injured

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे येथे यात्रेच्या फ्लेक्सवरून जगताप आणि घुले गटात तुंबळ हाणामारी ; शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 16:43
Next Post

गुळपोळीतील स्वामी समर्थ गणेश उत्सव मित्र मंडळाचा १४ वर्षांपासूनचा रक्तदान शिबिराचा उपक्रम प्रशंसनीय - पोलीस उपनिरीक्षक प्रविण जाधव ; रक्तदान शिबिरात ९३ बाटल्या संकलित...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.