पुणे : अजित दादा यांनी समर्थन केलं. ते सरकारचे अविभाज्य भाग आहेत. मी स्वतः त्याठिकाणी लोकसभेत होते. आम्ही लोकसभेत घोषणा दिल्या नव्हत्या. जर त्या माणसाच्या हातात बॉम्ब असता तर त्या दिवशी सर्व खासदारांचा कार्यक्रमच झाला असता. असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्या बोलत होत्या. खासदारांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थन केलं, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला होता, त्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं.
पुढे बोलताना म्हणाल्या, एखादा माणूस उडी मारून येतो, या देशाची सुरक्षेची जबाबदारी कोणाची? कांद्याला भाव आम्ही मागितला तसेच संसदेवरील हल्ला झालेल्या प्रश्नावर आम्ही बोललो. आता संसदेत नक्की काय झालं याची माहिती दादांना नसेल, असेही त्या म्हणाल्या.
अजित पवार बारामती लोकसभा जागेवर उमेदवार देणार आहेत, याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, राज्यात लोकशाही आहे, दिल्लीत दडपशाही आहे, असे उत्तर त्यांनी दिले. शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे यांच्याशी दिल्लीत चर्चा झाली आहे. येत्या १५ दिवसांत जागा वाटपा संदर्भात माहिती मिळेल, असही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.