Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका; ‘ही’ शेवटची संधी, पुन्हा चूक केली तर…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 15 September 2026, 18:42

पुणे : चित्रपट अभिनेता राजपाल यादव यांच्यासमोरील कायदेशीर अडचणीत आणखीन वाढच झाली आहे.चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना थकबाकी भरण्यासाठी दोन आठवड्यांची शेवटची मुदत दिली आहे. यादरम्यान पैसे परत करण्याचा स्पष्ट प्रस्ताव मांडण्यासोबतच 2 कोटी रुपये कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तोपर्यंत म्हणजेच 5 ऑक्टोबरपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्यापासून दिलासा मिळाला आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी

हे संपूर्ण प्रकरण ‘मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत झालेल्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे.2010 मध्ये एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी राजपाल यादव यांनी या कंपनीकडून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.2012 मध्ये व्याजासह जवळपास 11 कोटी रुपये परत करण्याचे आश्वासन राजपाल यादव, त्यांची पत्नी आणि कंपनीने दिले होते.
पैसे परत करण्यासाठी दिलेले 1.05 कोटी रुपयांचे एकूण 7 चेक बँकेत बाऊन्स झाले.

याप्रकरणी मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. राजपाल यादव यांनी यापूर्वी कोर्टाला दिलेली आश्वासने पाळली नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर सहजासहजी विश्वास ठेवता येत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे

दुसऱ्या बाजूने, तक्रारदार कंपनीच्या वकिलांनी आम्हाला फक्त आमची थकबाकी मिळण्यात रस असल्याचे स्पष्ट केले. तर राजपाल यादव यांच्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितले की, यादव यांनी यापूर्वी सुमारे 4.5 महिने तुरुंगवास भोगला आहे. त्यावेळी चित्रपटसृष्टीतील मित्रांच्या मदतीने त्यांची जामिनावर सुटका झाली होती. आता आर्थिक दायित्व पार पाडण्यासाठी यादव 2 कोटी रुपये जमा करण्यास तयार असून, उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी दोन आठवड्यांत ठोस योजना सादर केली जाईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11

भोसरी येथे घराचा दरवाजा वाजविल्याचा जाब विचारताच तलवारीने हल्ला; बाप-लेकाच्या हत्येचा प्रयत्न, दोघे अटकेत

Sunday, 29 November 2026, 12:07

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर टँकरद्वारे डल्ला? यवत येथे शेतीच्या पाण्याचा रस्त्याच्या कामासाठी उपसा; परिसरातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा

Sunday, 29 November 2026, 12:04
Next Post

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवाच्या काळात मध्यवर्ती पेठांमध्ये माल वाहतुकीवर कडक निर्बंध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp