Wednesday, September 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवाच्या काळात मध्यवर्ती पेठांमध्ये माल वाहतुकीवर कडक निर्बंध

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 15 September 2026, 18:55

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या मालवाहतुकीसाठी वेळेचे बंधन लागू केले आहे. १४ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पेठ परिसरातील दुकानांमध्ये मालाची ने-आण करणाऱ्या हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ या वेळेतच वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात बोहरी आळी, गणेश पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, मंडई परिसर, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड यासह मध्यवर्ती भागात नागरिक आणि भाविकांची मोठी गर्दी होते. या काळात मालवाहू वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघात आणि सुरक्षेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने तसेच इतर आपत्कालीन सेवेची वाहने नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. व्यापाऱ्यांनी निर्धारित वेळेतच मालाचे लोडिंग-अनलोडिंग करावे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, गणेशमूर्ती विसर्जनाच्या काळात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे अग्निशमन दलही सज्ज झाले आहे. शहरातील सुमारे १५ प्रमुख विसर्जन घाटांवर अग्निशमन दलाचे २० अधिकारी, २० जवान आणि १२० जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. जीवरक्षकांकडे लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, दोर आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने यांनी सोमवारी संगम घाट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटासह विविध विसर्जन घाटांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकारी, जवान आणि जीवरक्षकांशी संवाद साधून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. नदीपात्रात नागरिकांनी धोकादायक पद्धतीने उतरू नये, तसेच गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले.

दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासह अनंत चतुर्दशीला मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे विसर्जन घाटांसोबतच मिरवणूक मार्गांवरही अग्निशमन दलाची वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. नदी, तलाव आणि घाट परिसरात जीवरक्षकांचे पथक सतत लक्ष ठेवणार असून, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक! केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानाबाहेर मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न

Wednesday, 16 September 2026, 21:28

शेताच्या रस्त्यावरून तुफान राडा! वडकीत दोन भावांवर कोयत्याने हल्ला; चौघांवर गुन्हा

Wednesday, 16 September 2026, 21:00

“मला उशीर करू नका, माझ्यासाठी आरक्षण महत्त्वाचे”; प्रकृती खालावली तरीही जरांगे मुंबई गाठण्यावर ठाम

Wednesday, 16 September 2026, 20:21

बारामतीत सोमेश्वर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू; इच्छुकांच्या मुलाखतींना वेग

Wednesday, 16 September 2026, 19:38

गणेशोत्सवात एफडीएची धडक कारवाई; नामांकित हॉटेल्सचे परवाने रद्द, कोटींचा गुटखा जप्त

Wednesday, 16 September 2026, 18:53

“5 ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे तातडीने पंचनामे सुरू होणार” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे करणार दुष्काळी भागांची पाहणी

Wednesday, 16 September 2026, 18:37
Next Post

सहकारी साखर कारखान्यांसाठी सरकार मैदानात; मोठ्या निर्णयामुळे कारखान्यांना मिळणार बळ!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp