Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत सोमेश्वर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू; इच्छुकांच्या मुलाखतींना वेग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 16 September 2026, 19:38

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. युवा नेते युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथील कृष्णानगर हॉटेलच्या हॉलमध्ये या मुलाखती घेण्यात येत आहेत.

निवडणुकीत पक्षाकडून कोणाला संधी द्यायची, कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची आणि संभाव्य पॅनेलची रचना कशी असावी, याबाबत मुलाखतीच्या माध्यमातून माहिती घेतली जात आहे. विविध मतदारसंघांतून मोठ्या संख्येने इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविल्याने उमेदवारांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

इच्छुक उमेदवारांचा स्थानिक पातळीवरील जनसंपर्क, कारखान्याच्या सभासदांशी असलेला संपर्क, मतदारसंघातील परिस्थिती आणि निवडणुकीसाठीची तयारी याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली जात आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर पक्षाच्या संभाव्य पॅनेलचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी विविध राजकीय गटांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल, युगेंद्र पवार यांनी जाहीर केलेले शेतकरी पॅनेल आणि विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पॅनेल अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक सहकार क्षेत्रासोबतच बारामती, पुरंदर आणि परिसरातील राजकीय समीकरणांसाठीही महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, युगेंद्र पवार यांनी पवार विरुद्ध पवार अशी लढत करण्याचा आपला उद्देश नसल्याचे स्पष्ट केले. शेतकरी सभासदांसाठी सक्षम पर्याय उभा करण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांच्याबाबत आक्षेप नसून, सोमेश्वर कारखान्याच्या संचालकांच्या कामकाजाबाबत आपले मतभेद असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे सत्ता असल्याने यंदा बदल घडवण्याची गरज असल्याचे सांगत, संविधानिक मार्गाने हा बदल घडवून आणण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पद नाही तर काम नाही! तक्रारवाडीतील गावपुढाऱ्यांची सध्याची अवस्था; गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार कोण?

Monday, 16 November 2026, 14:04

विद्यार्थ्यांचा जीवघेणा होडी प्रवास थांबणार! निमसाखर-बांगर्डे पुलासाठी 25 कोटी मंजूर; दत्तात्रय भरणेंच्या पाठपुराव्याला यश

Monday, 16 November 2026, 13:25

भाडेकरूंची मनमानी थांबणार; घरमालकांना पोलिसांचा आधार! मुदत संपल्यानंतरही घराचा ताबा न देणाऱ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा

Monday, 16 November 2026, 13:20

माणुसकीला काळिमा! इंदापुरात नवजात बाळाला ओढ्याजवळ सोडले; सतर्क नागरिकामुळे वाचला जीव

Monday, 16 November 2026, 13:11

पुण्यात अमित शाह आणि फडणवीस यांची रात्री उशिरा बैठक! बंद दाराआड नेमकं काय ठरलं?

Monday, 16 November 2026, 12:02

महाबळेश्वरमधील 3 प्रसिद्ध हॉटेलचे परवाने निलंबित; FDA ची कारवाई

Monday, 16 November 2026, 11:23
Next Post

“मला उशीर करू नका, माझ्यासाठी आरक्षण महत्त्वाचे”; प्रकृती खालावली तरीही जरांगे मुंबई गाठण्यावर ठाम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp