दिल्ली : राज्यातील ओबीसीचे राजकीय आरक्षण व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणावर गेल्या आठवड्यात सुनावणी घेण्यात आली होती.
राज्यात ओबीसी आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अनेकांची भविष्ये अवलंबून आहेत. मागील सुनावणीमध्ये यात ९२ नगरपरिषदांच्या ओबीसीच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने अधिक वेळ मिळण्याची मागणी केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्याची मुदतवाढ दिली होती. आजच्या सुनावणीमध्ये राज्य सरकारला आपली बाजू स्पष्ट करावी लागणार आहे.
मुंबई पालिका प्रभाग रचनेच्या बाबतच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दर्शविला होता. त्यामुळे याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायलयात पुढील लढाई लढावी लागणार आहे.