युनुस तांबोळी
Bapusaheb Gawde Patsanstha शिरूर : टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील बापूसाहेब गावडे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनभाऊ गावडे तर उपाध्यक्षपदी खंडू सोनबा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ( Sunita Gawde as president and Khandu Jadhav as vice president unopposed elected on Bapusaheb Gawde Patsanstha at Takli Haji)
नवनिर्वाचीत संचालकांचा सत्कार
या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे (Bapusaheb Gawde Patsanstha)- सुनिता सोनभाऊ गावडे ,राजेंद्र पोपटराव गावडे, सुरेश नाना गावडे, खंडु सोनबा जाधव,कैलास लक्ष्मण गावडे, बाबाजी मारुती रासकर,मोहन म्हतु गावडे,अनिता रोहीदास घोडे, शंकर मुरलीधर होने,विनोद खंडु बोखारे, बाळासाहेब शंकर टेमकर हे निवडुन आले असल्यांचे निवडणुक निर्णय अधिकारी रुणवाल व पतसंस्थेचे व्यवस्थापक शरीफ तांबोळी यांनी सांगितले.
या वेळी नवनिर्वाचीत संचालकांचा सत्कार ग्रामस्थांनी केला. या निवडीनंतर गावातुन वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली .(Bapusaheb Gawde Patsanstha) हि निवडणुक बिनविरोध होण्यासाठी घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे व माजी सरपंच दामुशठ घोडे यांनी प्रयत्न केले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक एस एस कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एस एम रुणवाल यांनी काम पाहीले .
(Bapusaheb Gawde Patsanstha) यावेळी शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे , युवा नेते राजेंद्र गावडे,बाजार समितीचे माजी संचालक सावित्राशेठ थोरात , चांदाशेठ गावडे ,चंद्रकांत भाऊ साबळे, उद्योजक बापुसाहेब साबळे, चेअरमन प्रशांत चौरे, माजी प्राचार्य प्रभाकर खोमणे,माजी विद्याथ्यी संघटनेचे अध्यक्ष संभाजी साबळे, विकास सेवा संस्थेचे संचालक संतोष गावडे, सुभाष नाना गावडे,देविदास पवार, सुभाष चोरे, बबनराव चोरे, रामदास भाकरे, नारायण कांदळकर, सोपानराव औटी, प्राचार्य आर. बी. गावडे , शहाजी सोदक, अरुण हिलाल, स्वप्निल गावडे, बापुसाहेब होने, हनिफ आतार, विकास खाडे, संतोष घोडे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.