नमस्कार,
लातूर जिल्ह्यात १९९३ साली झालेल्या भुकंपातील माझे गाव तळणी, माझा जन्म १९८८ साली झाला. आम्ही पाच भावंडे (४ मुले व 1 मुलगी), साडेचार वर्षांचा असताना १९९४ ला वडिलांचे छत्र हरवले. वडिलांचे छत्र हरवल्यामुळे घरची परिस्थिती खुप हालाखिची, कारण घरी वडीलोपार्जित फक्त तीन एकर जमीन तीही कोरडवाहू, त्यामुळे शेती करणे अवघड.
माझ्या आईने वडिलांचे निधन झाल्यानंतर आम्हाला मोठे करण्यासाठी व शिक्षण देण्यासाठी अक्षरश: दुसऱ्याच्या घरची भांडी व धुणी धुण्याचे काम केले. स्वत: आई अशिक्षित पण मुलांना शिक्षण दिले. घरात आम्ही पाचही भांवडे शिकलेली. मोठा
भाऊ शिकल्यामुळे आम्हालाही त्याच्याकडे पाहुन शिकण्याची आवड निर्माण झाली.माझे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण गावातीलच त्रिवेणी देशमुख विद्यालयात झाले.
मी दहावीला असताना आयुष्यात पहिले अपयश आले ते ‘म्हणजे मी दहावीला गणित विषयात नापास झालो. काय करावे सुचेना, दोन वर्षे शिक्षण सोडून शेतात कामे केली. पण शिक्षणाची ओढ गप्प बसवत नहती. परत नेटाने अभ्यास केला व दहावी पास झालो. मला दहावीतील अपयश भरून काढायचे होते. परत बारावीला असताना जोराने अभ्यास केला व मी बारावीत पहिला आलो, ते यश बघुन आईचे डोळे पाणावले.
दरम्यान,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्यात आहेत. पदविच्या पहिल्या वर्षाला वाडिया कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले, पण आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मी पुणे विद्यापिठाच्या ‘कमवा व “शिका” योजनेत ३ वर्षे काम केले. व पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
कॉलेजमध्ये असताना स्पर्धा परिक्षा देण्याचा निर्णय घेतला, त्यादृष्टीने ” कमवा व शिका” योजनेतुन येणाऱ्या पैस्याने मी बरीचे पुस्तक विकत घेतली. २०११ साली पदवी पूर्ण केली. २०११ ते २०१२ हा कालावधी मी UPSC च्या अभ्यासासाठी दिला. २०११ साली UPSC ची पूर्व परीक्षा नापास झालो. पण 2012 सालची पूर्व परीक्षा पास होऊन मुख्यपरीक्षा दिली. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. ३ एप्रिल २०१२ मोठ्या भाऊ चा कार अॅक्सिडेंड झाला. व मला UPSC ची अध्यावर सोडावी लागली..
त्यानंतर २०१३ तेव्हा पासुन मी स्पर्धापरिक्षाचा अभ्यास बंद केला, व एका NGO मध्ये साडेतीन वर्षे काम केले, पण शिक्षणाची ओढ गप्प बसु देत नव्हती. त्यानंतर २०१३ ते २०१७ कालावधीत M.A चे शिक्षण पूर्ण केले. व २०१७ ते २०१९ मध्ये B.Ed पूर्ण केले. त्याच वर्षी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालो? २०१९ मध्ये B.Ed झाल्यानंतर कामाची गरज असल्यामुळे Rainbow International school, लोणी काळभोर” येथे शिक्षक पदावर रुजू झालो.
आयुष्यात परत संकट येऊन उथे राहिले ते म्हणजे ‘कोरोना’ होय. कोरोना काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे मी भाजी विकली. त्यानंतर Domind’s Pizzaमगरपट्टा व Airtel company मध्ये कामे केली. पण त्यामधून मला बरेच काही शिकायला मिळाले.२०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट पूर्ण कमी झाल्यानंतर ऑक्टोंबर शाळा सुरु झाल्या, आमच्या शाळेतील दहावीची पहिली बॅच याच वर्षाची असल्यामुळे खुप मोठे चॅलेंज होते. पण संस्थेचे चेअरमन नितीन काळभोर सर व सेक्रेटरी राजेश काळभोर सर, यांनी मला खुप प्रोत्साहन दिले. त्यामुळे दहावीची बॅच यशस्वीरीत्या100% निकालाने उत्तीर्ण झाली. या कार्याला मला राजेश काळभोर सरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सरांचा मी खुप आभारी आहे.
लिहिण्यासारखे बरेच आहे. पण कुठेना कुठ तर थांबावे लागते. आजपर्यंत मला घडविण्यासाठी ज्या ज्या लोकांनी, मित्रांनी व सरांनी मदत केली, त्याचे मनापासून शतशः ऋणी आहे. व त्याचे आभार व्यक्त करत धन्यवाद.
प्रा. प्रशांत अंबादास लाव्हरे
(मुळगाव तळणी, ता. औसा, जि. लातूर)