Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये सुमारे 2 लाखांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखूचा साठा जप्त; एका तरुणाला अटक

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 15 August 2026, 18:16

लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलिसांनी कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत घोरपडेवस्ती परिसरात कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत 1 लाख 91 हजार 180 रुपये किमतीचा विमल पानमसाला, तंबाखू/जर्दा व सुगंधित तंबाखू पोलिसांच्या हाती लागली. तर एकाला अटक केली आहे.

विकास किसन उतपुरे (वय २३, रा. घोरपडेवस्ती, लेन क्रमांक ३, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन भिमराव सोनवणे यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 12.10 वाजता घोरपडेवस्ती येथील एका घरात ही कारवाई करण्यात आली. आरोपीने शासनाने प्रतिबंधित केलेले तसेच मानवी आरोग्यास अपायकारक असलेले तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याचे तपासात आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी पोलीस अंमलदार सचिन सोनवणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलमांसह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा कर्करोग तसेच विविध गंभीर आजार होण्याचा धोका असल्याची जाणीव असतानाही त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तैबुद्दीन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Friday, 11 September 2026, 10:43

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24
Next Post

पुण्यात FDAचा धडाका! 16 आस्थापनांचे परवाने निलंबित; नियमभंग करणाऱ्यांवर मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp