पुणे : राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. निवडणुकीच्या तोंडावर कोणतेही निकष नसलेल्या या योजनेचा राज्यातील कोट्यवधी बहिणींनी लाभ घेतला. मात्र आता सरकार सत्तेत आल्यानंतर तिजोरीवर बोजा पडत असल्याचे सांगत योजनेतील निकषावरून अर्जांशी पडताळणी करण्यास सुरुवात झाली. यातून तब्बल 9 लाख लाडक्या बहिणी बाद झाल्या. या लाडक्या बहिणीमुळे राज्य सरकारची तिजोरीच आता मालामाल झाली. यामुळे सरकारच्या 1620 कोटी रुपये वाचले.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील 9 लाख बहिणी या योजनेतून बाद झाल्या. राज्य सरकारच्या निकषाच्या एका निर्णयाने राज्यातील अनेक बहिणींना फटका बसला.. या योजनेतील अनेक गैरप्रकार समोर आले. तर या योजनने सरकारी तिजोरीवर मोठा ताण येत असल्याचे उघड झाले.. आता लाभार्थ्यांसाठी अनेक निकष लावण्यात आले आहेत. या चाळणीमुळे सरकारचे 1620 कोटी वाचले आहेत. आतापर्यंत जुलै ते जानेवारी या महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले आहेत. फेब्रुवारीचा हफ्ता जमा होण्यास आता सुरूवात ही झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी जोरदार टीकाही केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांचे मत विकत घेण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत असल्याचा आरोप ही विरोधकांकडूनहोत होता.गेल्यावर्षी जुलै महिन्यात सुरू झाल्यापासून 2.5 कोटी महिलांना फायदा झाला. या योजनेतील महिलांचा वयोगट 30-39 वर्षो वयोगटातील 29 टक्के महिलांचा समावेश, 40-49 गटातील 23.6 टक्के, 50-65 वयोगटातील 22 टक्के, 60-65 वयोगटातील 5 टक्के महिला आहे. आता नवीन निकषांची चर्चा होत आहे. त्यानुसार, 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणार्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे.








