Gunaratna Sadavarte st strike : मुंबई : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाकडून ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली आहे. त्याला सर्व सटी कामगार प्रतिसाद देतील अस वाटत होतं. परंतु त्यांच्या या हाकेला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला दिसत नाही. राज्यातील सर्वच विभागात एसटीची सेवा सुरळीत सुरु आहे. यामुळे सदावर्ते यांनी पुकारलेला संप फसला असल्याच दिसत आहे.
शासनाकडून चर्चेच आवाहन
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी संपाची हाक देताच राज्य सरकारने पावले उचलायला सुरूवात केली आहे. राज्य शासनाने आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत बैठक बोलवली आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. मात्र, ज्यांच्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी संपाची हाक दिली, त्यांनीच याकडे दुर्लक्ष केल्याने, गुणरत्न सदावर्ते यांचं चांगलचं हसू उडाल्याच दिसतयं. राज्यात सर्वत्र एसटीची वाहतूक सुरळीत सुरु आहे.
राज्य सरकारकडून चर्चेची तयारी
मोडकळीस आलेल्या गाड्या, सातवा वेतन आयोग लागू करणे, शिस्त आवेदन पद्धत रद्द करणे, दिवाळी बोनस आणि वाढीव महागाई भत्ता देणे हे प्रमुख मुद्यांसाठी काम बंद पुकारले होते. ऐन दिवाळीत प्रवाशांना फटका बसू नये यासाठी सरकारकडून मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली आहे. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सेवाशक्ती संघटनेकडून देखील आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.