सौरभ सुतार
निरा नरसिंहपुर : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील समाधी सोहळ्यासाठी सालाबाद प्रमाणे राज्यातून व राज्या बाहेरील भाविक भक्त व वारकऱ्यांच्या दिंड्या लाखोंच्या संख्येने आळंदीकडे जाऊ लागल्या आहेत.
श्री गुरु सोपान काका महाराज देहूकर पंढरपूर यांची सांप्रदायिक दिंडी सोहळा प्रमुख श्रीगुरु बापूसाहेब महाराज, श्रीगुरु बाळासाहेब महाराज, श्रीगुरु कानोबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक काळापासून परंपरेनुसार चालू आहे. पायी दिंडी सोहळा मंगळवार (ता. ०८) ते गुरुवार (ता. १७) पर्यंत पंढरपूर पासून ते आळंदी देवाची या ठिकाणी जाण्यासाठी दिंडी मार्गस्थ झाली आहे.
पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील सुतार समाजाच्या वतीने सुतार वस्ती येथील भाविक भक्त चंद्रकांत बाबुराव सुतार यांच्या निवासस्थानी सांप्रदायिक दिंडी सोहळ्यासाठी चहापाणी नाष्टा देण्यात आला. तसेच ग्रामपंचायतिच्या वतीने पिंपरी गावामध्ये दिंडी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी गावचे उद्योजक शरद विठ्ठल बोडके यांच्या वतीने दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, श्रीगुरु सोपान काका महाराज देहुकर यांच्या सांप्रदायिक दिंडी सोहळ्या सोबत सर्व भाविक भक्त, दिंडी चोपदार सहादेव तमालवाडी, उद्धव काजवे, शंकर डोळसकर, नागनाथ पाटील, बाळासाहेब निकम, भानुदास जाधव, भाऊ पाटील, सोपान सोलंकर, या सर्वांच्या उपस्थितीत कार्तिकी वारीसाठी सर्व भाविक भक्तांच्या व महिला भगिनींच्या उपस्थितीत दिंडी सोहळा पुढील ठिकाणी मुक्कामी जाण्यासाठी मार्गस्थ झाला.