Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर येथील ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 2 May 2026, 21:10

थेऊर, ता.2 : महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या व महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत थेऊर (ता.हवेली) मंडल भागात आयोजित करण्यात आलेल्या भव्य “महाराजस्व समाधान शिबिराला” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या शिबिरात हजारहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. या अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

थेऊरफाटा- थेऊर रोडवरील आशिर्वाद बॅक्वेट हॉल येथे पार पडलेल्या या शिबिराचे आयोजन पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. काकडे यांनी या उपक्रमासाठी विशेष पाठपुरावा करत विविध विभागांना एकत्र आणले. नागरिकांच्या समस्या एकाच छताखाली जलद गतीने सोडविणे शक्य झाले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे शासकीय अडथळे दूर करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

थेऊर, कोलवडी, साष्टे, कुंजीरवाडी आणि मांजरी बु. या गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिबिरात महसूल, पोलीस, कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख, पाटबंधारे, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाज कल्याण अर्थसहाय्य, वन विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, निवासी दाखले, सातबारा उतारे, फेरफार, वारस नोंद, ई-मोजणी, तुकडेबंदी नियमितीकरण, पीएम किसान, नमो किसान, संजय गांधी निराधार, दिव्यांग योजना तसेच ग्रामपंचायत करसंबंधित प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करण्यात आले. अनेक प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यात आला. तसेच काही लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

 

या कार्यक्रमास पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, अतिरिक्त गटविकास अधिकारी शिवाजी नागवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, जि. प. सदस्या शितल सुजित कांबळे, सुरेखा रमेश हरगुडे, संदेश आव्हाळे, दिलीप वाल्हेकर, पंचायत समिती उपसभापती विद्याताई गायकवाड, सदस्य कुशाल सातव, कृषिराज चौधरी, सुदर्शन चौधरी, अमोल टेकाळे, कोमल गणेश कांबळे, सुषमा मुरकुटे, राणी वाळके यांच्यासह महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, आजी माजी पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या अभियानामुळे शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत वेगाने पोहोचत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दोघंही आयटी इंजिनिअर, कामानिमित्त भेटले, प्रेम जुळलं लग्न केलं अन् नंतर असं काही घडलं की विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल…

Friday, 19 June 2026, 18:57

‘तुझी बायको मला, माझी तुला!’ फेसबूकवरून चालते पार्टनर स्वॅपिंगचे गलिच्छ रॅकेट; एका रात्रीचे मिळतात 20 हजार

Friday, 19 June 2026, 18:14

वरवंड येथील “हॉटेल सिद्धेश्वर प्युअर व्हेज” मधून वीजचोरी; दोघांवर गुन्हा दाखल 

Friday, 19 June 2026, 18:09

हिंजवडी मेट्रो सज्ज! 6 ते 8 मिनिटांच्या अंतराने धावणार ट्रेन; तिकीट आता तुमच्या व्हॉट्सॲपवर

Friday, 19 June 2026, 18:06

सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखतंय? असू शकतो शुगर कमी होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

Friday, 19 June 2026, 17:15

पुणे-बंगळुरू महामार्गावरील ‘अडथळा’ कायम! कराड उड्डाणपुलाचे काम पुन्हा रेंगाळले, वाहनचालकांमध्ये संताप

Friday, 19 June 2026, 17:09
Next Post

Solapur Triple Murder Case : सोलापूरात दीड एकर जमिनीच्या वादातून तिहेरी हत्याकांड, संशयित आरोपी फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.