Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यात आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे १०५ जणांनी गमावला जीव; कोकणाला काहीसा दिलासा, वर्धा जिल्ह्यात १३६ मि.मी. पाऊस

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 19 July 2022, 11:45

पुणे : मुसळधार पावसामुळे राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.  आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे १०५ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर १८९ प्राणी दगावले आहेत. राज्यात वर्धा जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी १३६ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे.

कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५.९ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहे. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा दिनांक ३०.०७.२०२२ पर्यंत सकाळी ०६ वा. पासून ते सायंकाळी ०७ वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी ७ वा. ते सकाळी ६ वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे.

नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ११३ मिमी एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत.
या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. लक्ष्मी बॅरेज (मेडीगडा) चे सर्व ८५ दरवाजे उघडले आहेत.

गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

वर्धा जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १३६.४ मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या बचावाकरिता एनडीआरएफ (NDRF) टीम व दोन एसडीआरएफ (SDRF)च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात
मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर -१,रायगड- महाड- १, ठाणे-२,रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२,सातारा-१,सिंधुदुर्ग-१, गडचिरोली -१ शा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ ,वर्धा-२ अशा एकूण चार राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी ७ तुकड्या
मुंबई -३, पुणे-२ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२, अशा एकूण २ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत नाट्यमय घडामोडी! निवडणुकीत तिरंगी सामना; जगतापांच्या बंडाने समीकरणे बदलली

Wednesday, 30 September 2026, 17:31

पुणेकरांची वाहतूक कोंडी सुटणार! बहुप्रतिक्षित HCMTR प्रकल्पाचे काम अखेर ४ टप्प्यांत मार्गी लागणार

Wednesday, 30 September 2026, 17:10

सोरतापवाडीत चारचाकी गाडी अडवून तरुणाला मारहाण ; काचा फोडून चावीही नेली, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 30 September 2026, 16:39

१ ऑक्टोबरपासून देशात होणार मोठे बदल! एलपीजी सिलिंडर, एटीएम चार्जेस अन् जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या सर्व अपडेट्स

Wednesday, 30 September 2026, 16:32

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती ? पर्यावरणप्रेमींचा सवाल; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि फेरपंचनाम्याची मागणी

Wednesday, 30 September 2026, 16:29

दिवाळीत फटाक्यांवर पुन्हा निर्बंध? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभराचं लक्ष ‘त्या’ आदेशाकडे!

Wednesday, 30 September 2026, 16:12
Next Post

पिपंरी-चिंचवड सोशल मीडिया परिषदेची नवीन कार्यकारणी जाहीर ; अध्यक्षपदी सुरज साळवे यांची निवड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp