Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील बिल्डर आत्महत्या प्रकरणात महत्वाची अपडेट! शिंदेचा शिलेदार पत्नीसह फरार, अटकेसाठी पोलीस पथक रवाना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 19 July 2026, 12:21

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अडकलेले माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी धंगेकर दाम्पत्यासह एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल केला असून, सध्या हे दोघेही ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. पोलीस त्यांच्या मागावर असून कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

खलील शेख हे 2011 पासून पुण्यामध्ये सेंट्रिंग आणि बांधकामाची कामे करत होते. कामाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी बाजारातून व्याजाने मोठी रक्कम घेतली होती. ‘उत्कर्ष असोसिएट’ या भागीदारी फर्ममध्ये रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी, बाळा शेडगे आणि रघू गौडा यांच्या पत्नी भागीदार होत्या. मात्र, शेख यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, हे सर्वजण केवळ नावापुरतेच भागीदार होते आणि या फर्मचा संपूर्ण मुख्य कारभार स्वतः रवींद्र धंगेकर हेच सांभाळत होते.

भागीदारांनी व्याजासह पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात कोणाकडूनही पैसे मिळाले नाहीत. खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांचे तब्बल 2.5 कोटी रुपये येणे बाकी असल्याचे म्हटले आहे. पैशांसाठी सतत हेलपाटे मारूनही न्याय न मिळाल्याने ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते आणि याच त्रासाला कंटाळून त्यांनी गळफास लावून आपले आयुष्य संपवले.

 

आत्महत्या करण्यापूर्वी खलील शेख यांनी एक व्हिडिओ बनवला होता. तसेच त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी घटनास्थळावरील इमारतीच्या बाहेर चिकटवली होती, तर दुसरी चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली. या सुसाईड नोट आणि व्हिडिओमध्ये त्यांनी थेट रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे आणि त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह इतर भागीदारांना आपल्या मृत्यूसाठी थेट जबाबदार धरले आहे.

पोलीस अटकेपासून वाचण्यासाठी धंगेकर दाम्पत्याने कायदेशीर हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी अज्ञात स्थळी पळ काढला आहे. दुसरीकडे, पुणे पोलिसांनी धंगेकरांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना केली असून पैशांच्या व्यवहाराचा सखोल तपास सुरू केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

संबंध एकीसोबत तर संसार दुसरीसोबत! ३ वर्ष लग्नाचं आमिष दाखवत शरीरसंबंध ठेवले नंतर दुसऱ्याच तरुणीसोबत…युवा नेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Monday, 5 October 2026, 19:28

मगरपट्टा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सातही आरोपी निर्दोष मुक्त; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

Monday, 5 October 2026, 19:21

अन् नराधमांनी तिला वासनेचा शिकार बनवलं! लॉजवर नेत कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं; धमकी देत दोघांनी आळीपाळीने शरीराचे लचके…

Monday, 5 October 2026, 19:14

सहकार महर्षी हरपले! ‘शरद’ कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत घोडके यांच्या निधनाने पैठणमध्ये शोककळा

Monday, 5 October 2026, 19:07

शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Monday, 5 October 2026, 18:04

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या MPSC आंदोलनाला मोठे यश! MPSC च्या माजी आणि विद्यमान अध्यक्षांवर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मोठी शिफारस

Monday, 5 October 2026, 16:56
Next Post

हिंजवडीचे ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन पुणे जिल्हाध्यक्षपदी विक्रमी मतांनी फेरनिवड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp